सचिनची कोरोनावर मात केलेल्यांना कळकळीची विनंती (video) | पुढारी

सचिनची कोरोनावर मात केलेल्यांना कळकळीची विनंती (video)

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर पोस्ट करत त्याला ४८ व्या वाढदिवसादिवशी दिलेल्या शुभेच्छांबद्दल चाहत्यांच आभार मानले. याचबरोबर कोरोनावर मात केलेल्या सचिनने आपल्यासारखेच कोरोनातून बाहेर आलेल्यांना एक कळकळीची विनंती केली. त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करुन कोरोना काळात त्याची काळजी घेतलेल्या कुटुंबीय, मित्र, डॉक्टरांचे आभार मानले. तसेच जास्तीजास्त प्लाझ्मा दान करण्याची विनंती केली. 

सचिन तेंडुलकरने आपल्या व्हिडिओत ज्यांनी ज्यांनी त्याला जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या त्यांचे आभार मानले. तुम्ही सर्वांनी माझा दिवस चांगला घालवला असे तो म्हणाला. याचबरोबर त्याने गेला महिना हा त्याच्यासाठी फार कठिण होता असे सांगितले. त्याने आपण कोरोनावर कशी मात केली हेही सांगितले. त्याने आपण गेल्या महिन्यातील २१ दिवस विलगीकरणात घालवले. त्यावेळी तुमच्या प्रार्थना, माझ्या कुटुंबीयांनी, मित्रांनी आणि डॉक्टर त्यांचा सपोर्ट स्टाफ यांनी आपली मानसिकता सकारात्मक ठेवण्यास मदत केल्याचे सांगितले. 

त्यानंतर सचिन तेंडुलकरने एक महत्वाची विनंती त्याच्यासारखेच कोरोनावर मात केलेल्या लोकांना केली. त्याने ज्यांना कोरोना होऊन गेला आहे त्यांनी कृपा करुन प्लाझ्मा दान करा. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कोरोनाच्या गंभीर रुग्णांना योग्य वेळी प्लाझ्मा दिला तर त्याचा त्यांना खूप फायदा होतो. आपण सर्वजण कोरोनामधून गेलो आहोत आपल्याला हे दुखणे कसे आहे याची कल्पना आहे. त्यामुळे कृपा करुन प्लाझ्मा दान करा अशी कळकळीची विनंती त्यांने केली. याचबरोबर त्याने परवानगी मिळाल्यानंतर तोही प्लाझ्मा दान करणार असल्याचे सांगितले.

Back to top button