नवदीप सैनीच्या हर्ले डेव्हिडसनचा 'धुरळा'  | पुढारी

नवदीप सैनीच्या हर्ले डेव्हिडसनचा 'धुरळा' 

पुढारी ऑनलाईन डेस्क : नवदीप सैनीच्या हर्ले डेव्हिडसनचा एका व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. भारतचा वेगावान गोलंदाज नवदीप सैनाला वेगवान गोलंदाजीबरोबच वेगवान बाईकचेही वेड आहे. त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवर त्याच्या हर्ले डेविडसन बाईकचा व्हिडिओ शेअर केला आहे. 

नवदीप सैनीने या व्हिडिओला ‘मझ्या आणि माझ्या बाईक सोबत हर्ले डेव्हिडसनची दरारा अनुभवा’ असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडिओत शर्टलेस असलेला नवदीप सैनी ऑफरोडवर हर्ले डेव्हिडसन बाईकचा फडफडणारा आवाज आणि त्याच्या मगच्या चाकातून उडणारा धरळा दाखवत आहे. या व्हिडिओतील हर्ले डेव्हिडसनच्या आवाजावरुनच त्याच्या इंजिनची ताकद दिसून येते. 

या व्हिडिओला आतापर्यंत चाहत्यांचे १४०० पेक्षा जास्त रिट्विट आणि २० हजार पेक्षा जास्त लाईक मिळाले आहेत. जरी नवदीप सैनीची बाईक राक्षसी आवाज करत असली तरी यंदाच्या आयपीएलमध्ये सैनीला एकाच सामन्यात आपली वेगवान गोलंदाजी दाखवण्याची संधी मिळाली होती. त्याला स्थगित झालेल्या आयपीएलमध्ये आरसीबीच्या ८ सामन्यापैकी  एका सामन्यातच संधी मिळाली हाोती.

गेल्या आयपीएल हंगामात सैनीने १३ सामन्यात ६ विकेट्स घेतल्या होत्या. त्याची सरासरी ८ होती. पण, त्याचा २०२० – २१ मधील ऑस्ट्रेलिया दौरा चांगला गेला होता. त्याने गाबा कसोटीत टिच्चून मारा केला होता. दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावे लागले. पण, दुसर्‍या डावात तो गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा मैदानात उतरला. सैनीने आतापर्यंत भारताकडून २ कसोटी, ७ एकदिवसीय आणि ९ टी – २० सामने खेळले आहेत.  

Back to top button