टीम इंडियाचे इंग्लंडमध्ये ‘लँडिंग’ | पुढारी | पुढारी

टीम इंडियाचे इंग्लंडमध्ये ‘लँडिंग’ | पुढारी

साऊथहॅम्पटन : वृत्तसंस्था

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी रवाना झालेला भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये पोहोचला. या दौर्‍यावर टीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका देखील खेळायची आहे. भारतीय स्टार फलंदाज के. एल. राहुलने गुरुवारी एक फोटो शेअर केला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघ 18 जूनपासून न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे. हा सामना साऊथहॅम्पटनच्या एजिस बाऊल मैदानावर खेळला जाईल. यानंतर टीम इंडिया 4 ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. इंग्लंडमध्ये भारतीय संघाला आता क्वारंटाईन करण्यात येईल. यापूर्वी टीम इंडिया मुंबईत क्वारंटाईनमध्ये होती. 

यापूर्वी बीसीसीआयने पुरुष आणि महिला क्रिकेट संघातील खेळाडूंचा फोटो शेअर केला होता. त्यामध्ये ते सर्व विमानतळावर बसलेले दिसले. बुधवारी हे खेळाडू लंडनला रवाना झाले होते. खास गोष्ट म्हणजे महिला आणि पुरुष क्रिकेट संघ एकाच विमानाने लंडनमध्ये पोहोचले आहेत.

 

Back to top button