मोदींकडून मिल्खा सिंग यांच्या प्रकृतीची विचारपूस | पुढारी

मोदींकडून मिल्खा सिंग यांच्या प्रकृतीची विचारपूस

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : फ्लाइंग शीख या नावाने ओळखले जाणारे माजी धावपटू मिल्खा सिंग यांना चंदीगडच्या पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मोदी यांनी मिल्खा सिंग यांना दूरध्वनी करीत ते लवकर बरे व्हावेत, अशी कामना केली. 

अधिक वाचा : कॉनवेने गांगुलीचे लॉर्ड्सवरील २५ वर्षापूर्वीचे मोडले रेकॉर्ड

मिल्खा सिंग यांना कोरोनाचे संक्रमण झाले आहेत. तब्येत बिघडल्यानंतर गुरुवारी तयांना पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आपण लवकरात लवकर बरे व्हाल आणि ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंचे मनोबल उंचवाल, असे मोदी यांनी मिल्खा सिंग यांना संभाषणादरम्यान सांगितले. पीजीआयच्या कोविड अतिदक्षता विभागात मिल्खा सिंग यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अधिक वाचा : भारतातील टी २० वर्ल्डकप युएईत होणार? 

ताप, भीती वाटणे तसेच अंग कापण्याची तक्रार केल्यानंतर कुटुंबियांनी सिंग यांना रुग्णालयात हलविले होते. 19 मे रोजी मिल्खा सिंग यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले होते. याठिकाणी ते काही दिवस ते ऑक्सिजनवर होते. 30 मे रोजी त्यांना परत घरी आणण्यात आले होते. 91 वर्षीय मिल्खा सिंग यांनी आतापर्यंत कोरोनाची लस घेतलेली नाही.

Back to top button