आयपीएल : सर्वाधिक विकेटस् घेणार्‍यांच्या यादीमध्ये आहे एकमेव भारतीय - पुढारी

आयपीएल : सर्वाधिक विकेटस् घेणार्‍यांच्या यादीमध्ये आहे एकमेव भारतीय

मुंबई ; वृत्तसंस्था : यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये धावांचा पाऊस पडत असून दुसरीकडे गोलंदाज विकेटही घेत आहेत. चालू हंगामात आतापर्यंत सर्वात जास्त विकेटस् युजवेंद्र चहलने आपल्या नावावर केल्या आहेत. दरम्यान, आयपीएल इतिहासात एका हंगामात सर्वाधिक विकेटस् कोणत्या खेळाडूने घेतल्या याबाबतची माहिती रोचक आहे. मुख्य म्हणजे या यादीत केवळ एकमेव भारतीय असून त्याचे नाव आहे हर्षल पटेल. या खेळाडूंच्या यादीतील अन्य नावे ड्वेन ब्राव्हो, कागिसो रबाडा, लसिथ मलिंगा आणि जेम्स फॉकनर अशी आहेत.

आयपीएल 2021 मध्ये हर्षल पटेलने शानदार कामगिरी केली होती. तो 15 सामने खेळला. 56.2 षटके टाकून त्याने 14.34 च्या सरासरीने 32 विकेटस् घेतल्या होत्या. या काळात त्याची सर्वोत्तम कामगिरी 5/27 अशी होती. ड्वेन ब्राव्होने आयपीएल 2013 च्या हंगामात 18 सामन्यांमध्ये 15.53 च्या सरासरीने 32 विकेटस् घेतल्या होत्या.

त्याने यावर्षी 62.3 षटके टाकली. 42 धावांत 4 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तसेच कागिसो रबाडाने आयपीएल 21 मध्ये 17 सामन्यांत 30 विकेटस् घेतल्या होत्या. या हंगामात त्याने 8.34 च्या इकॉनॉमीने आणि 18.26 च्या सरासरीने गोलंदाजी केली. 24 धावांत 4 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

लसिथ मलिंगाने 2011 च्या हंगामात 16 सामन्यांत 13.39 च्या सरासरीने आणि 5.95 च्या इकॉनॉमीने 28 विकेटस् घेतल्या होत्या. 13 धावांत 5 बळी ही मलिंगाची सर्वोत्तम कामगिरी ठरली होती. मलिंगाने तेव्हा 63 षटके टाकली आणि 375 धावा दिल्या होत्या. आयपीएल 2013 मध्ये जेम्स फॉकनरने 16 सामन्यांमध्ये 15.25 च्या सरासरीने आणि 6.75 च्या इकॉनॉमीने 28 विकेटस् घेतल्या. 16 धावांत 5 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. त्याने 63.1 षटके टाकली आणि 427 धावा दिल्या होत्या.

Back to top button