पुढारी ऑनलाईन डेस्क : चेन्नई सुपर किंग्ज (CSK)चा अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) बुधवारी, 11 मे रोजी IPL 2022 मधून बाहेर पडला. दुखापतीमुळे सीएसकेने हा निर्णय घेतला आहे. मात्र या प्रकरणात काहीतरी वेगळे असल्याचे मानले जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जडेजाच्या टीम मॅनेजमेंटसोबतच्या मतभेदांमुळे हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. तथापि, व्यवस्थापनाने कोणतेही मतभेद असल्याचे स्पष्टपणे नाकारले आहे.
फ्रँचायझीचे सीईओ म्हणाले, 'जडेजाला (Ravindra Jadeja) बरगड्यांमध्ये दुखापत झाली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध (४ मे) खेळल्या गेलेल्या सामन्यात झाली होती त्याला ही दुखापत झाली होती. आमच्या संघाचे आता फक्त दोन सामने बाकी आहेत आणि पुढे आम्हाला वाटले की त्याला आणखी दुखापत होऊ नये आणि त्याला विश्रांती देणे आवश्यक आहे.'
सूत्रानुसार, रवींद्र जडेजा आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये सर्व काही ठीक नसल्याची बातमी आहे. जडेजानेही इन्स्टाग्रामवर सीएसकेला फॉलो करणे बंद केले आहे. सोशल मीडियावर अनफॉलो करण्याच्या जडेजाच्या निर्णयाबद्दल सीएसकेचे सीईओ म्हणाले की, आम्ही या गोष्टीला फारसे महत्त्व देत नाहीत. मला इन्स्टाग्राम आणि ट्विटरसारख्या गोष्टींबद्दल काहीही माहिती नाही आणि मी तुम्हाला याबद्दल जास्त सांगू शकणार नाही.
आयपीएल 2022 चा हंगाम सुरू होण्यापूर्वी अष्टपैलू रवींद्र जडेजाकडे (Ravindra Jadeja) चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ची कमान सोपवण्यात आली होती. या मोसमातील पहिल्या 8 सामन्यांनंतर जडेजाने कर्णधारपद सोडले. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीला पुन्हा संघाचा कर्णधार बनवण्यात आले. एमएस धोनी कर्णधार झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने त्यांच्या 9व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध विजय मिळवला. त्याच वेळी, पुढील सामन्यात संघाला रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात एका झेलवेळी रवींद्र जडेजा टेन्शनमध्ये दिसला. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्धच्या सामन्यात जडेजा प्लेइंग इलेव्हनचा भागच नव्हता.
रवींद्र जडेजाबाबत सध्या मोठी बातमी येत आहे. वास्तविक, असे म्हटले जात आहे की चेन्नई सुपर किंग्स (CSK)ने रवींद्र जडेजाला इंस्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. या प्रकाराने आता सट्टाबाजार चांगलाच तापला आहे. रवींद्र जडेजा चेन्नई सुपर किंग्जलाच (CSK) टाटा-बायबाय करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. यापूर्वी आयपीएल 2022 हंगामात चेन्नई सुपर किंग्जला (CSK) रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली 8 सामन्यांत 6 पराभवांना सामोरे जावे लागले होते. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीला पुन्हा संघाचा कर्णधार बनवण्यात आले.
दरम्यान, याप्रकरणी रवींद्र जडेजाचे कोणतेही वक्तव्य आतापर्यंत समोर आलेले नाही. पण फ्रँचायझीने जडेजाला अनफॉलो केल्याच्या वृत्तानंतर, रवींद्र जडेजा आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) व्यवस्थापनामध्ये सर्व काही ठीक नसल्याचा अंदाज लावला जात आहे. तसेच, रवींद्र जडेजा आणि चेन्नई संघात काहीही चांगले चालले नसल्याचा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे.
यामुळे चेन्नई सुपर किंग्ज (CSK) व्यवस्थापनाने जडेजाला इंस्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. जडेजासाठी हा मोसम खूप निराशाजनक राहिला. या मोसमात त्याने आतापर्यंत 10 सामन्यात 19.33 च्या सरासरीने केवळ 116 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर तो गोलंदाजीतही फ्लॉप ठरला. या मोसमात त्याने आतापर्यंत केवळ 5 विकेट्स घेतल्या आहेत.