WTC INDvsNZ : अंतिम सामन्यासाठी संघाची घोषणा | पुढारी

WTC INDvsNZ : अंतिम सामन्यासाठी संघाची घोषणा

साऊथाप्टन; पुढारी ऑनलाईन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल कसोटी सामन्यासाठी भारतीय अंतिम ११ संघाची घोषणा आज करण्यात आली. भारतीय संघ १८ जून पासून न्यूझीलंड विरुद्ध अंतिम कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी भारत ६ फलंदाज आणि ५ गोलंदाज अशा रणनितीने मैदानावर उतरणार आहे. ५ गोलंदाजांमध्ये भारताने मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह या तीन वेगवान गोलंदाजांना संधी दिली आहे. तर रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा ही फिरकी जोडी असणार आहे. 

तर फलंदाजीत रोहित शर्मा आणि शुभमन गिल सलामीला उतरणार आहेत. तर मधल्या फळीत चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत यांचा सामावेश असणार आहे. रविंद्र जडेजा आणि आर. अश्विन हे दोघेही अष्टपैलू म्हणून गणले जातात त्यामुळे भारतीय फलंदाजीची डेप्थ ८ व्या क्रमांकापर्यंत आहे.  

Image

 

Back to top button