#WTC2021 : न्यूझीलंडची दमदार सुरुवात | पुढारी

#WTC2021 : न्यूझीलंडची दमदार सुरुवात

साऊथहॅमप्टन; पुढारी ऑनलाईन : लॅथम बाद झाल्यानंतर सलामीवीर कॉनवे आणि कर्णधार केन विल्यमसन यांनी न्यूझीलंडच्या डावला चांगले सावरले. दरम्यान कॉनवे याने आपले अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी ३१ धावांची भागिदारी रचली. ही जोडी पुन्हा भारतास डोकेदुखी ठरत असताना इंशात शर्मा याने ४९ व्या षटकातील ४ थ्या चेंडूवर कॉनवे याला झेल बाद केले. कॉनवे याने ५४ धावांची चांगली खेळी केली. सध्या केन विल्यमसन हा १२ धावांवर खेळत आहे. केनच्या साथीला रॉस टेलर हा मैदानात उतरला आहे. पण, अंधूक वातावरणामुळे तुर्तास खेळ थांबविण्यात आला आहे. सध्या न्यूझीलंडचा धावफलक २ बाद १०१ असा आहे.     

न्यूझीलंडच्या सलामीवीरांसमोर भारताच्या जलदगतील गोलंदाजी दमछाक झाल्यानंतर ३५ व्या षटकात रवीचंद्रन अश्विन याने लॅथमला बाद केले आणि ७० व्या धावसंख्येवर न्यूझीलंडने पहिला गडी गमावला.  लॅथम नंतर कर्णधार केन विल्यमसन खेळपट्टीवर आला आहे. सध्या न्यूझीलंडची धावसंख्या ३६ षटकात १ बाद ७१ अशी आहे.       

भारताचा २१७ वर पहिला डाव संपुष्टात आल्यावर न्युझिलंडचे सलामीवीर लॅथम आणि कोनवे या दोघांनी सावध खेळ करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. चहापानापर्यंत न्युझिलंडने विकेट न गमावता ३६ धावा केल्या. लॅथम १७ तर कॉनवे १८ धावांवर खेळत आहेत.

भारतीय वेगवान गोलंदाजांनी दुसऱ्या सत्रात गोलंदाजीचा भेदक मारा केला परंतू न्युझिलंडची एकही विकेट घेण्यात यश आले नाही. टी ब्रेकच्या शेवटच्या षटकात शमीच्या बॉलवर लॅथमच्या बॅटला किनारा लागून रहाणेच्या दिशेने गेला परंतू रहाणेच्या डोक्यावरून गेल्यामुळे हा झेल असफल ठरला. दरम्यान न्युझिलंडच्या सलामीविरांनी भारतीय गोलंदाजांना कोणतीही संधी दिली नाही. भारतीय फलंदाजांपेक्षा अधिक विश्वासार्हता न्युझिलंडच्या फलंदाजामध्ये दिसून येतेय.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात साऊथॅम्प्टन येथे खेळल्या जाणार्‍या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या तिसर्‍या दिवशी दुसर्‍या सत्रात भारताचा पहिला डाव २१७ धावांवर थांबला. तर ७ व्या स्थानावर आलेल्या जडेजाने डाव सावरत शेवटपर्यंत खेळी केली. भारताची धावसंख्या ७ बाद २०५ अशी होती, परंतू कायले जेमसनने भेदक गोलंदाजीच्या माऱ्यासमोर भारतीय संघाला २१७ धावांपर्यंत मजल मारता आली.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्‍या तिसर्‍या दिवशी पहिल्‍या सत्रातच भारत बॅकफूटवर गेला. विराट पाठाेपाठ ऋषभ पंत बाद झाला. यानंतर अजिंक्‍य राहाणेचेही अर्धशतक हुकले. अश्‍विन आणि रवींद्र जडेजाने डाव सावरण्‍याचा प्रयत्‍न करत धावफलक हालते ठेवत २०० धावांचा टप्‍पा पूर्ण केला. मात्र झटपट धावा करण्‍याच्‍या प्रयत्‍नात टिम साऊदीने अश्‍विनला तंबूत धाडले. अश्‍विनने ३ चौकारांह २२ धावा केल्‍या.

धावफलक : सर्वबाद २१७ धावा  

पहिल्‍या सत्रात न्‍यूझीलंडने भारताला तीन धक्‍के दिले.  खेळाची सुरुवात झाल्‍यानंतर तीन षटकांमध्‍येच काईल जेमिसन याने विराटला पायचित  केले.  यानंतर अवघ्‍या चार धावांवर ऋषभ पंतलाही जेमीसनने लॅथमकडे झेल देणे भाग पाडले. यानंतर रवींद्र जडेजाबराेबर अजिंक्‍यने डाव सावरण्‍याचा प्रयत्‍न केला;पण त्‍याचे अर्धशतक हुकले. नील वॅगनरने त्याला लॅथमकरवी ४९ धावांवर बाद केले. 

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्‍ये प्रथम फलंदाजी करताना भारतची सुरुवात चांगली झाली हाोती. राेहित शर्माने खराब चेंडूवर आक्रमक फटके मारत धावफलक हालता ठेवला होता. रोहितची आश्वासक सुरुवात पाहून तो मोठी खेळी करणार असे वाटत असतानाच कायल जेमिसनने त्याला ३४ धावांवर बाद केले. रोहित बाद झाला त्यावेळी भारताच्या ६२ धावा झाल्या होत्या. रोहित बाद झाल्यानंतर शुभमन गिलवर धावफलक हालता ठेवण्याची जबाबदारी आली. पण, वॅगनरने त्याला २८ धावांवर बाद करत भारताला ६३ धावांवर दुसरा धक्का दिला.  

दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यावर भारताचा डाव पुढे नेण्याची जबाबदारी कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांच्यावर आली होती. या दोघांनी उपहारापर्यंत किल्ला लढवला. पण, उपहारानंतर सावध फलंदाजी करणाऱ्या चेतेश्वर पुजाराला बोल्टने ८ धावांवर माघारी धाडले. शंभरीच्या आत भारताचे तीन शिलेदार माघारी गेल्यानंतर कर्णधार विराटला साथ देण्यासाठी उपकर्णधार अजिंक्य रहाणे खेळपट्टीवर आला. या दोघांनी संघाचे शतक धावफलकावर लावले. मात्र अंधूक प्रकाशामुळे खेळ थांबविण्‍यात आला हाेता.

Back to top button