अर्जेंटिना बाद फेरीत | पुढारी | पुढारी

अर्जेंटिना बाद फेरीत | पुढारी

कुईएबा (ब्राझील) : वृत्तसंस्था

पापू गोमेजने दहाव्या मिनिटाला झळकावलेल्या गोलच्या जोरावर कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत अर्जेंटिना संघाने पॅराग्वेला 1-0 असे पराभूत करत पुढच्या फेरीत धडक मारली. अर्जेंटिना संघ तीन सामन्यांत सात गुणांसह ‘अ’ गटात अव्वल स्थानी आहे. हा सामना लियोनल मेस्सीचा विक्रमी 147 वा सामना होता. त्याने माजी डिफेंडर झेव्हियर मस्केरानोसशी बरोबरी केली. सामन्याच्या सुरुवातीला गोल केल्यानंतर अर्जेंटिना संघाच्या बचाव फळीने चांगली कामगिरी करत प्रतिस्पर्धी संघाला एकही गोल करू दिला नाही.

याच स्पर्धेतील चिली आणि उरुग्वे यांच्यातील सामना हा 1-1 असा बरोबरीत संपला. सूआरेजने सामन्याच्या 66 व्या मिनिटाला बरोबरीचा गोल केला. चिलीकडून एडूआर्डो वर्गासने 26 व्या मिनिटाला गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. दुसर्‍या सत्रात सूआरेजने गोल करत सामना बरोबरीत आणला. या निकालानंतर चिली संघाने बाद फेरीत धडक मारली; पण उरुग्वे संघाच्या आशा अजूनही कायम आहेत. अर्जेंटिना गटात अव्वल स्थानी असून, चिलीचा संघ पाच गुणांसह दुसर्‍या स्थानी आहे. पॅराग्वे संघाचे तीन व उरुग्वेचा एक गुण आहे, तर बोलिव्हिया संघाला खातेही उघडता आले नाही.

Back to top button