WTC21: फायनलमधून प्रेक्षकांना काढले बाहेर | पुढारी

WTC21: फायनलमधून प्रेक्षकांना काढले बाहेर

साऊथॅम्पटन; पुढारी ऑनलाईन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC21) फायनल दरम्यान एक अप्रिय घटना घडली. मंगळवारी काही प्रक्षकांनी न्यूझीलंडच्या खेळाडूंबद्दल अपमानजनक टिप्पणी केली. त्यामुळे आयसीसीने या प्रेक्षकांवर कारवाई केल्याचे सांगितले. 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये प्रेक्षकांनी रंगत भरली होती. यात बहुतांश भारतीय संघाचे पाठीराखे होते. त्यांनी आपल्या आवाजाने सामन्यात चांगलीच चुरस निर्माण केली. त्यामुळे भारतीय संघाबरोबरच न्यूझीलंडचाही संघही चार्ज झाला. सामन्याच्या पाचव्या दिवशी न्यूझीलंडने भारतीय संघावर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान, काही प्रक्षकांनी न्यूझीलंडच्या खेळाडूंना अपमानित करणारी टिप्पणी केली. 

वाचा : #WTC21 : भारताची शंभरी पार

याबाबत आयसीसीचे प्रवक्त्यांनी दिवसाचा खेळ संपला त्यावेळी माहिती दिली. त्यांनी ‘आम्हाला न्यूझीलंडच्या खेळाडूंचा अपमान करणारी टिप्पणी काही प्रेक्षकांनी केल्याची तक्रार मिळाली होती. आमच्या सुरक्षा रक्षकांना या प्रेक्षकांना शोधण्यात यश आले आहे. त्यांनी या प्रेक्षकांना मैदानातून बाहेर काढले आहे. आम्ही क्रिकेटच्या मैदानात कोणत्याही प्रकारची अपमानित करणारी प्रवृत्तीला थारा देणार नाही.’ असे सांगितले.

न्यूझीलंडचा खेळाडू टीम साऊदीनेही दिवसाचा खेळ संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत सांगितले. तो म्हणाला ‘मला सर्वात प्रथम ही टिप्पणी ऐकू आली. मैदानात खेळ हा कायम चांगल्या भावनेने खेळला गेला पाहिजे.’

वाचा : संथ खेळणाऱ्या विल्यमसनला सेहवागनं केलं ट्रोल

दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ( WTC ) फायनलमध्ये आज सहाव्या दिवशी भारताने आपला दुसरा डाव २ बाद ६४ धावांवरुन पुढे सुरु केला. पण, कायल जेमिसनने पुन्हा एकदा भारताला धक्के देण्यास सुरुवात केली. जेमिसनने कर्णधार विराट कोहलीला १३ धावांवर बाद केले. त्यानंतर ८० चेंडूत १५ धावा करुन सेट होण्याच्या प्रयत्नात असलेल्या पुजाराचीही शिकार केली. त्यामुळे भारताची अवस्था २ बाद ६४ वरुन ४ बाद ७२ अशी झाली.

Back to top button