पॅरालिम्पिक नेमबाज विकतेय बिस्किटे | पुढारी | पुढारी

पॅरालिम्पिक नेमबाज विकतेय बिस्किटे | पुढारी

नवी दिल्‍ली ; पुढारी वृत्तसेवा : उत्तराखंडमधील खेळाडूंना राज्य सरकार किती प्रमाणात प्रोत्साहन देते, याची प्रचिती डेहराडूनमध्ये समोर आली आहे. डेहराडूनमध्ये राहणारी 28 सुवर्णपदके जिंकणारी पहिली अपंग नेमबाज दिलराज कौर आर्थिक संकटाशी झुंज देत आहे. सध्या ती गांधी पार्कच्या बाहेर आपल्या वृद्ध आईबरोबर चिप्स आणि बिस्किटे विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे.

अधिक वाचा : #WTC21 : किवींनी दोन वर्षापूर्वीच्या जखमेवर फुंकर मारली

पॅरालिम्पिक नेमबाजीत एकेकाळी आंतरराष्ट्रीय स्तरावर रौप्यपदक जिंकणारी दिलजित कौर सध्या आर्थिक संकटाचा सामना करीत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर एक रौप्य, राष्ट्रीय पातळीवर 28 सुवर्ण अशी अनेक पदके तिने जिंकली आहेत, एवढेच नाही तर जागतिक पॅरा क्रीडा क्षेत्रातील पहिली प्रमाणित प्रशिक्षक, क्रीडा शिक्षिका अशा अनेक कामगिरी तिने केल्या आहेत; पण सध्या सगळीकडूनच ती संकटात अडकली आहे. अशा परिस्थितीने तिच्या डोक्यावरील बाप आणि भावाचे छत्र हिरावले गेले.

अधिक वाचा : WTC21: फायनलमधून प्रेक्षकांना काढले बाहेर

परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की सरकारला आरसा दाखविण्यासाठी गांधी उद्यानाच्या बाहेर आपल्या वृद्ध आईबरोबर ती स्नॅक्स आणि बिस्किटे विकत आहे. बचतीच्या रूपात असलेले काही पैसे वडिलांच्या गंभीर आजारावर खर्च झाले. आता म्हातार्‍या आईच्या उपचारासाठी आणि तिच्या खर्चासाठी दुसरा पर्याय नव्हता म्हणून गांधी उद्यानाबाहेर स्नॅक्स आणि बिस्किटांची विक्री करण्यास तिने सुरुवात केल्याचे सांगितले.

अधिक वाचा : ‘रोनाल्डो’च नाही तर ‘कोहली’नेही ‘पेप्सी’च्या कोट्यवधींच्या ऑफरवर सोडलं होतं पाणी

आंतरराष्ट्रीय स्तरावर शूटिंगमध्ये पदक जिंकणार्‍या मुलीची अवस्था पाहून आईलाही अश्रू अनावर होत आहेत. वृद्ध आईसुद्धा आपल्या मुलीच्या मदतीसाठी दिवसभर गांधी पार्कच्या बाहेर बसते आणि जे काही मिळते त्यासह कुटुंबाची काळजी घेते.

दिलराज कौर नक्‍कीच एक दिव्यांग आहे. मात्र, तिची जिद्द द‍ृढ राहिली आहे. तिने परिस्थितीपुढे कधीही हार मानली नाही. अगदी सुरुवातीपासूनच तिने तिचे शूटिंग इतके चांगले केले की ती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली. 

Back to top button