अखेर ठरलं! टी-२० वर्ल्ड कप होणार पण भारतात नाही, तर 'या' देशात | पुढारी

अखेर ठरलं! टी-२० वर्ल्ड कप होणार पण भारतात नाही, तर 'या' देशात

मुंबई; पुढारी ऑनलाईन: टी-२० वर्ल्डकप ठरलेल्या वेळापत्रकानुसार भारतात होणार होता. पण, आता बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी हा वर्ल्डकप भारताऐवजी संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई)  होणार असल्याचे सांगितले आहे. ही स्पर्धा आता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये युएईत होणार आहे. 

वाचा : पराभवानंतर रोनाल्डो बेल्जियमच्या गोलकिपरला काय म्हणाला?

सौरभ गांगुलींनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, ‘आम्ही आयसीसीला अधिकृतरित्या सांगितले आहे की, टी – २० वर्ल्डकप युएईमध्ये हलवण्यात येऊ शकतो. याबाबतचा आराखडा तयार करण्यात येत आहे.’ आयसीसीने महिन्याच्या सुरुवातीला बीसीसीआयला टी – २० वर्ल्डकप आयोजनासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी ४ आठवड्यांचा वेळ दिला होता. 

भारतात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्यामुळे आयपीएलही मध्‍येच थांबवावी लागली होती. पण, आता उर्वरित आयपीएल युएईमध्ये सप्टेंबर -ऑक्टोबरमध्ये होणार आहे. 

वाचा : धोनी ट्रोल झालेल्या फोटोमागचे सत्य नेमकं काय?

यापूर्वी बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी काही दिवसांपूर्वीच याबाबत महत्वाचे संकेत दिले होते. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी शनिवारी भारतात होणारा टी- २० वर्ल्डकप हा संयुक्त अरब अमिरातीमध्ये शिफ्ट होण्याची शक्यता वर्तवली होती. 

जय शहा यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले होते की, ‘आपल्या देशातील कोरोनाची स्थिती पाहता टी – २० वर्ल्डकप युएईला शिफ्ट होण्याची शक्यता आहे. आम्ही परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत. खेळाडूंची सुरक्षितता आणि आरोग्य याला सर्वोच्च प्राधान्य आहे. याबात अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे.’

Back to top button