दिनेश कार्तिक बद्दल रवी शास्त्री ड्रेसिंग रुममधून काय म्हणाले? - पुढारी

दिनेश कार्तिक बद्दल रवी शास्त्री ड्रेसिंग रुममधून काय म्हणाले?

नॉटिंगहॅम : पुढारी ऑनलाईन

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक आता नव्या भुमिकेत दिसत आहे. त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपासून समालोचन सुरु केले आहे. जेव्हापासून त्याने माईक हातात घेतला आहे तेव्हापासून त्याच्यावर समालोचक म्हणून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

क्रिकेट जगतातील दिग्गज लोकही त्याच्या समालोचनाचे कौतुक करत आहेत. भारताचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री हे देखील उत्कृष्ट समालोचक आहेत. त्यांनी अनेक ऐतिहासिक क्षण आपल्या समालोचनाने अजरामर केले आहेत. त्यांनी समालोचन क्षेत्रातील उभरत्या ताऱ्याला ड्रेसिंग रुममधून आपली प्रतिक्रिया दिली.

ज्यावेळी समालोचक डेव्हिड लॉईड दिनेश कार्तिकच्या समालोचनाचे कौतुक करत होते. त्यावेळी रवी शास्त्री ड्रेसिंग रुममधून रेडिओवर समालोचन ऐकत होते. त्यांनी ड्रेसिंग रुममधून थम्स अप करुन लॉईड यांच्या वक्तव्याला आपले समर्थन दिले.

रवी शास्त्री यांनी दिलेली ही प्रतिक्रिया समालोचक म्हणून आपली दुसरी इनिंग सुरु करणाऱ्या दिनेश कार्तिक साठी फार मोठी आहे. दिनेश कार्तिक समालोचन स्टँडमध्ये आनंदी दिसत आहे. तो हे नवे आव्हान चांगल्या प्रकारे पेलत आहे.

दरम्यान, पत्रकार भारत सुंदरेसन यांनी दिनेश कार्तिकला रवी शास्त्री यांनी प्रोत्साहन देण्याचा संदर्भ घेत ट्विट केले होते. भारत यांनी ‘गेल्या महिन्यापासून दिनेश कार्तिकने केलेल्या समालोचनाला दाद मिळत आहे. आता त्याला रवी शास्त्री यांच्याकडून डबल थम्स अप मिळाल्याने त्याच्या आत्मविश्वासाला उभारी मिळाली आहे.’ असे ट्विट केले होते.

त्याला दिनेश कार्तिकने ‘हो नक्कीच भारत’ अशी प्रतिक्रिया दिली.

दिनेश कार्तिक माईकवाणी करण्यात रमला

दिनेश कार्तिकने इंग्लंड आणि भारत यांच्यातील कसोटी सामन्यासाठी स्काय स्पोर्ट्स समालोचन समितीचा फोटो शेअर केला होता. यात मायकल होल्डिंग, माईक अथर्टन, लेन वार्ड, डेव्हिड लाईड आणि मेल जोनेस यांचा समावेश होता.

कार्तिकची ही नवी इनिंग चाहत्यांना फारच भावली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलवेळी त्याने चाहत्यांना हवामानाचा अंदाजही सोशल मीडियावरून उत्तम प्रकारे आणि हटके दिला. कार्तिकने इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या एकदिवसीय मालिकेतही समालोचन केले होते. त्याने भारताचे माजी खेळाडूच फक्त समालोचन करतात हा समज मोडून काढला.

हेही वाचले का?

पाहा व्हिडिओ : त्या दगडांचा आवाज अजूनही माझ्या कानात आहे….

Back to top button