बंगळूरचा हैदराबादवर दमदार विजय | पुढारी

बंगळूरचा हैदराबादवर दमदार विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हैदराबादविरूध्द बंगळूर यांच्यात झालेल्या सामन्यात बंगळूरने हैदराबादवर ६७ धावांनी विजय मिळवला. . फाफ डू प्लेसिसने कर्णधार पदाला साजेशी खेळी करत नाबाद ७३ धावांची खेळी केली. फाफला त्याच्या इतर सहकारी फलंदाजांनीहा उत्तम साथ दिली. या विजयामध्ये बंगळूरचा फिरकी गोलंदाज वानिदू हसरंगा याने महत्त्‍वाची भूमिका बजावली. त्याने ४ ओव्हरमध्ये १८ धाव देऊन ५ बळी घेतले.

सामन्यच्या सुरूवातीला नाणेफेक जिंकून बंगळूरने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. बंगळूरसाठी सामन्याची सुरूवात निराशाजनक झाली, कोहली पहिल्याच चेंडूवर बाद झाला. या विराट बाद झाल्यानंतर सलामी फलंदाज फाफ डू प्लेसिसने कर्णधार पदाला साजेशी खेळी केली. त्याने १४६ च्या सरासरीने ५० चेंडूत ७३ धावा केल्या. यावेळी त्याने ८ चौकार आणि २ षटकारही लगावले.७३ धावा करून तो नाबाद राहिला. त्याच्यासोबत रजत पाटीदारने २ ऱ्या विकेटसाठी १०५ धावांची भागेदारी केली. पाटीदार अर्धशतकाच्या उंभरट्यावक असताना त्याला राहूल त्रिपाठीने बाद केले तो ३८ चेंडूत ४८ धावा करून बाद झाला. ग्लेन मॅक्सवेलने २४ चेंडूत ३३ धावा करून बाद झाला त्याला कार्तिक त्यागीने बाद केले, संघाचा अनुभवी व डावखुरा फलंदाज दिनेश कार्तिकने आक्रमक खेळी करत ३७५च्या सरासरीने ८ बॉलमध्ये ३० धावा केल्या. यावेळी त्याने ४ षटकार आणि १ चौकार लगावले.

बंगळूरने हैदराबादसमोर ठेवलेल्या १९३ धावांचा पाठलाग करताना हैदराबादच्या संघाला पहिल्याच ओव्हरमध्ये लागोपाठ दोन धक्के बसले. हैदराबादचे दोन्ही सलामीवीर फलंदाज तंबूत परतले. अभिषेक शर्माला ग्लेन मॅक्सवेलला बाद केले. तर हैदराबादचा कर्णधार केन विलियमसन शून्य धावांवर रन-आऊट झाला. हैदराबादच्या फलंदाजांना बंगळूरच्या गोलंदाजांनी केलेल्या तिखट माऱ्यापुढे फारकाळ टिकताआला नाही.हैदराबादची मधली फळी कोलमडत गेली. हैदराबादकडून फलंदाजी करताना राहूल त्रिपाठी याने ३७ बॉलमध्ये सर्वाधिक ५८ धावा केल्या. त्याला हेझलवूडने बाद केले. हैदराबादच्या फलंदाजांनी बंगळूरचा गोलंदाज वानिंदू हलरंगापुढे सपशेल लोटांगण घातले. त्याने हैदराबादचा अर्धा संघ तंबूत धाडला.

Back to top button