Sunil Gavaskar : सुनिल गावस्कर म्हणाले ‘हा’ खेळाडू ‘आईस मॅन’, टीम इंडियाचा भविष्यातील स्टार

Sunil Gavaskar : सुनिल गावस्कर म्हणाले ‘हा’ खेळाडू ‘आईस मॅन’, टीम इंडियाचा भविष्यातील स्टार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2022 मध्ये गुजरात टायटन्सचे प्रतिनिधित्व करणारा स्टार खेळाडू राहुल तेवतियाने टीम इंडियाचे माजी खेळाडू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांचे मन जिंकले आहे. गावस्कर यांनी तेवतियाचे तोंडभरून कौतुक केले आहे. हा खेळाडू अशक्य ते शक्य करून दाखवू शकतो, असे गौरोद्गार त्यांनी राहुलबाबत काढले आहेत. तेवतिया गुजरात टायटन्ससाठी उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने अनेक सामन्यांमध्ये शेवटच्या षटकात संघाला विजय मिळवून दिला आहे. याच जिगबाज खेळीच्या जोरावर त्याचा भारताच्या T20 संघातील निवडीचा त्याचा दावा पक्का असल्याचे मानले जात आहे.

शारजाहमध्ये तेवतियाने कॉट्रेलला 5 चेंडूत 5 षटकार ठोकले होते….

शारजाहमध्ये आयपीएल 2020 दरम्यान, तेवतियाने जोरदार फटकेबाजीचे प्रदर्शन केले होते. त्याने शेल्डन कॉट्रेलाच्या एकाच षटकात पाच षटकार ठोकले होते. त्या वादळी खेळीने तेवतियाला आत्मविश्वास दिला की, तो अशा प्रकारे खेळू शकतो. आयपीएल 2022 मध्ये तेवतिया गुजरात टायटन्ससाठी उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने अनेक सामन्यांमध्ये शेवटच्या षटकात संघाला विजय मिळवून दिला आहे. (Sunil Gavaskar)

तेवतिया 'आईसमॅन'

गावस्कर (Sunil Gavaskar) म्हणाले, शारजाहमध्ये शेल्डन कॉट्रेलच्या एकाच षटकात पाच षटकार ठोकल्यानंतर तेवतियाचा आत्मविश्वास वाढला. आपण अशक्य गोष्ट शक्य करू शकतो अशी त्याला जाणीव झाली. डेथ ओव्हर्समध्ये त्याच्या फलंदाजीतील आत्मविश्वास दिसून येतो. तो चेंडू येण्याची वाट पाहतो आणि त्यानंतर बेधडक पण आत्मविश्वासपूर्ण शॉट खेळतो. त्याच्याकडे सर्व शॉट्स आहेत पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संकटाच्या वेळी आपला संयम न गमावण्याची त्याच्याकडे गुणवत्ता आहे, ज्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. त्यामुळे मी त्याला आईस मॅन म्हणतो.

सॅमसनला आईस मॅन का म्हणतो?

गावसकर म्हणाले, 'तेवतियाला आईस मॅन म्हणतो कारण तो क्रीजवर असेल तर तो अजिबात घाबरत नाही. तो चेंडू जाणतो आणि कोणता शॉट खेळायचा हे त्याला माहीत असते. त्याची मनात तयारी झालेली असते की, इथे चेंडू पडला तर कसा शॉट खेळायचा, आणि चेंडू सीमापार धाडायचा. तो आइस मॅन का आहे याचे कारण म्हणजे तो बिकट परिस्थितीला घाबरत नाही. निडरपणे सामना करतो.'

यंदाच्या IPL 2022 च्या हंगामात राहुल तेवतियाची आयपीएल लिलावात गुजरातच्या संघाने 9 कोटींना विकत घेतले. त्यानेही आपल्या शानदार खेळीने संघ सहकारी आणि व्यवस्थापनाची मने जिंकली. शेवटच्या षटकात विजय मिळवून देण्याच्या त्याच्या स्टाईलवर चाहतेही फिदा झाले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news