IPL 2022 : ‘हा’ खेळाडू अपयशी ठरला तर थांबू शकतो गुजरातचा विजय रथ!
पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल 2022 (IPL 2022) चा थरार शिगेला पोहोचला आहे. सर्वच संघ एकमेकांशी स्पर्धा करून सामना जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. पण विजय त्याच संघाचा होत आहे, ज्याची कामगिरी उत्कृष्ट आहे. आज (दि. 3 मे) आयपीएल 2022 चा 48 वा सामना गुजरात टायटन्स (gujrat titans) आणि पंजाब किंग्ज यांच्यात डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहे. गुजरात टायटन्सच्या लागोपाठच्या विजयात राहुल तेवतिया (rahul tewatia) महत्त्वपूर्ण योगदान देत आहे.
राहुत तेवतिया (rahul tewatia) हा IPL 2022 मध्ये गुजरातच्या संघाचा महत्त्वाचा भाग आहे. गुजरात टायटन्सच्या विजयात राहुलचा मोठा वाटा आहे. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत येतो तेव्हा तो आपल्या शानदार फलंदाजीने संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावतो.
तेवतियाने (rahul tewatia) आयपीएल 2022 (IPL 2022)मध्ये आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 179 धावा केल्या आहेत. तेवतियाच्या बॅटमधून इतक्या धावा निघाल्याने संघाला अनेक वेळा विजय मिळवता आला आहे. आजच्या पंजाब विरुद्धच्या सामन्यातही राहुल तुफानी स्टाईलमध्ये फलंदाजी करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. तेवतियाच्या बॅट गरजली आणि सामना जिंकला तर गुजरात टायटन्स आजच्या सामन्यातच प्लेऑफमध्ये स्थान पक्के करेल.
IPL 2022 मध्ये, गुजरात टायटन्सने आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. यादरम्यान संघाने 8 सामने जिंकले आहेत. एका सामन्यात पराभूत होत असताना. गुजरातचा संघ 16 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे.