PBKS vs LSG : लखनौचे पंजाबसमोर 154 धावांचे आव्हान | पुढारी

PBKS vs LSG : लखनौचे पंजाबसमोर 154 धावांचे आव्हान

पुढारी ऑनलाईन डेस्क

आयपीएल 2022 चा 42 वा सामना आज खेळला जात आहे. लखनौ सुपर जायंट्सने पंजाब किंग्जसमोर विजयासाठी 154 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना लखनौने आठ गडी गमावून 153 धावा केल्या. लखनौ संघाने शेवटच्या 55 धावांमध्ये सात विकेट गमावल्या. लखनौकडून क्विंटन डी कॉकने 47 धावा केल्या. पंजाबकडून रबाडा आणि राहुल चहर यांनी मिळून सहा विकेट घेतल्या. रबाडाने चार आणि चहरने दोन गडी बाद केले.

लखनौ संघात बदल करण्यात आला आहे. संघाने मनीष पांडेच्या जागी आवेश खानला संधी दिली आहे. तर, पंजाब किंग्जने आजच्या सामन्यात कोणताही बदल केला नसून केवळ आपल्या जुन्या संघावर विश्वास ठेवत मैदानात उतरले आहेत. पंजाब किंग्जचा कर्णधार मयांक अग्रवालने नाणेफेक जिंकून लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

डी कॉकचे अर्धशतक हुकले

क्विंटन डी कॉकचे अर्धशतक हुकले. त्याला 13 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर संदीप शर्माने जितेश शर्माच्या हाती झेलबाद केले. डी कॉकने बाद होण्यापूर्वी 37 चेंडूत 46 धावा केल्या.

दुसऱ्याच षटकात रबाडा महागात पडला

दुसरे षटक कागिसो रबाडासाठी महागडे ठरले. त्याच्या षटकात डी कॉकने लागोपाठ दोन षटकार खेचले आणि एकूण 16 धावा वसूल केल्या.

केएल राहुल सहा धावांवर बाद

लखनौचा कर्णधार केएल राहुल यावेळी मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. तिसर्‍याच षटकात तो जितेश शर्माकरवी कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. राहुलने बाद होण्यापूर्वी 11 चेंडूत सहा धावा केल्या.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

पंजाब किंग्ज :

मयंक अग्रवाल, शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टन, जितेश शर्मा, भानुका राजपक्षे, ऋषी धवन, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग, संदीप शर्मा, राहुल चहर

Image

लखनौ सुपर जायंट्स :

केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), कृणाल पांड्या, आयुष बडोनी, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, जेसन होल्डर, रवी बिश्नोई, दुष्मंता चमीरा, मोहसिन खान, आवेश खान

Image

Back to top button