पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल 2022 च्या 38 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला पंजाब किंग्जकडून 11 धावांनी पराभव पत्करावा लागला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 बाद 187 धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्जचा संघ 6 विकेटच्या मोबदल्यात 176 धावाच करू शकला. (IPL 2022)
चेन्नई सुपर किंग्जचा स्पर्धेतील हा सहावा पराभव होता आणि आता त्यांची प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता धुसर झाली आहे. सीएसकेचा 8 सामन्यांमधला हा सहावा पराभव होता आणि ते गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहेत. (IPL 2022)
चेन्नई सुपर किंग्जच्या पराभवानंतर कर्णधार रवींद्र जडेजाने आपल्या संघाच्या अपयशाचे कारण सांगितले. सामना संपल्यानंतर जडेजा म्हणाला, 'मला वाटते की आम्ही खूप चांगली सुरुवात केली. नवीन चेंडूवर गोलंदाजांनी चांगला मारा केला. पण मला वाटतं शेवटच्या दोन-तीन षटकांत आम्ही 10-15 धावा अतिरिक्त दिल्या. आम्ही आमची योजना नीट राबवण्यात अपयशी ठरलो. (IPL 2022)
चेन्नईसाठी शानदार खेळी केल्याबद्दल जडेजाने अंबाती रायडूचे कौतुक केले. रायुडूने अवघ्या 39 चेंडूंत 7 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 78 धावा केल्या. रायुडूच्या खेळीनंतरही सीएसकेला सामना जिंकता आला नाही. जडेजा म्हणाला, 'माझ्या मते रायडूने शानदार फलंदाजी केली. पण मी म्हटल्याप्रमाणे, आम्ही त्यांना 170-175 धावांवर रोखायला हवे होते.' (IPL 2022)
188 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सीएसकेची सुरुवात चांगली झाली नाही कारण सातव्या षटकात त्यांनी 40 धावांत तीन विकेट गमावल्या. याबाबत बोलताना जडेजा म्हणाला, 'पहिल्या 6 षटकांमध्ये आम्ही चांगली कामगिरी केली नाही. पहिल्या सहा षटकांमध्ये आम्ही धावफलकावर जास्त जमवल्या नाहीत. त्यामुळे आम्हाला त्यात सुधारणा करण्याची गरज आहे आणि त्यानंतरच आम्ही मजबूत पुनरागमन करू.' (IPL 2022)
मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जचा 8 सामन्यांमधला हा चौथा विजय आहे. आयपीएल 2022 च्या गुणतालिकेत पंजाब किंग्जचा संघ सध्या सहाव्या स्थानावर आहे. चेन्नई सुपर किंग्ज आता त्यांचा पुढील सामना 1 मे रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळणार आहे. दुसरीकडे पंजाब किंग्जचा पुढील सामना 29 एप्रिलला लखनौ सुपरजायंट्सशी होणार आहे. (IPL 2022)