KL Rahul : केएल. राहुलच्‍या लग्नाबाबत मित्राने केला मोठा खुलासा! | पुढारी

KL Rahul : केएल. राहुलच्‍या लग्नाबाबत मित्राने केला मोठा खुलासा!

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू आणि बॉलीवूड अभिनेत्रींचा मैत्रीतून प्रेमाचा प्रवास आपण अनेकदा पाहिला आहे. या लिस्टमध्ये अनेक खेळाडू आणि अभिनेत्रींचा समावेश आहे. आता या लिस्टमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक फलंदाज के.एल.राहूल आणि बॉलीवूडचा आण्णा म्हणजेच सुनील शेट्टीची कन्या अथिया शेट्टी यांचे नाव या लिस्टमध्ये समाविष्ट झाले आहे. यांची मैत्री जगजाहीर आहेच . या दोघांचे एकत्रीत फोटो आपण सोशल मीडियावरती पाहत असतो. (KL Rahul)

आयपीएलच्या सामन्यात तर सुनील शेट्टी आणि अथिया शेट्टी राहूल कर्णधार असलेल्या लखनऊ सुपर जायंटस् संघाला समर्थन करताना देखील पाहिले आहे.आता के.एल.राहूल आणि अथिया शेट्टी या कपल बद्दल नवीन माहितीसमोर आली आहे. के.एल.राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी ही जोडी या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात लग्नबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. (KL Rahul)

अथिया शेट्टीच्या मित्राने सांगितले की, राहूल आणि अथिया शेट्टी या वर्षी लग्‍न करणार नाहीत. यावर्षी दोन प्रोजेक्ट्सचे काम असल्यामुळे अथिया शेट्टी व्यस्त आहे. हे दोन्ही प्रोजेक्टसचे काम वेगवेगळ्या कालावधीत सुरु होणार आहेत. दुसरीकडे के.एल. राहूल आगामी टी-२० विश्वचषकावर लक्ष केंद्रीत केले आहे. यंदाच्या आयपीएल हंगाामातील लखनऊ सुपर जायटस या संघाच्या कर्णधारपदाची धुरा राहुलकडे आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty)

यामुळे या दोघांकडे लग्न करण्यासाठी वेळ कुठे आहे? असे मित्राने यावेळी म्हटले. केएल राहुलचा १८ एप्रिल रोजी नुकताच वाढदिवस झाला. यावेळी अथियाने राहुलसोबतचा फोटो शेअर करत त्याला खास शुभेच्छा दिल्या.  अथियाने पोस्ट केलेल्या फोटोवर राहुलनेदेखील लव्ह यू म्हणत शुभेच्‍छा  स्‍वीकारल्‍या.  त्यानंतर ही जोडी या वर्षाच्या शेवटी लग्नबंधनात अडकणार चर्चा रंगली हाेती.

Back to top button