Tennis Star Maria Sharapova : टेनिस कोर्टवरच्या सौंदर्यवतीनं दिली गुड न्यूज! मारिया शारापोव्हा पहिल्या बाळाची आई होणार

Tennis Star Maria Sharapova : टेनिस कोर्टवरच्या सौंदर्यवतीनं दिली गुड न्यूज! मारिया शारापोव्हा पहिल्या बाळाची आई होणार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

टेनिस कोर्टवरची सौंदर्यवती रशियन टेनिसपटू मारिया शारापोव्हा (Tennis Star Maria Sharapova) हिने गुड न्यूज दिली आहे. ती प्रेग्नेंट असून तिचा फियान्स अलेक्झांडर गिल्केस याच्या बाळाची ती आई होणार आहे. तिने इन्स्टाग्रामवर ही गुड न्यूज शेअर केली आहे.

टेनिसमधून निवृत्ती घेतलेल्या मारिया शारापोव्हाने समुद्रकिनाऱ्यावर घेतलेला बेबी बंपचा एक फोटो पोस्ट केला आहे. "आनंदाची सुरुवात!!! दोघांनी वाढदिवसाचा केक खाणे हे नेहमीच माझे वैशिष्ट्य राहिले आहे." अशी कॅप्शन देत तिने हा फोटो शेअर केला आहे.
एका यूजरने त्यावर कमेंट करत म्हटले आहे की, "पुढील चांगल्या वर्षासाठी तुम्हा दोघांचे अभिनंदन!!" दुसर्‍या एका युजरने लिहिले आहे, "अरे व्वा, मारिया! तू गुड न्यूज दिल्याने मी खूप आनंदी आहे! ही आश्चर्यकारक बातमी आहे. तुझे अभिनंदन! आणि तुम्हा तिघांना खूप खूप शुभेच्छा!"

डिसेंबर २०२० मध्ये मारियाने एंगेजमेंटची घोषणी केली होती. त्यावेळी मारियाने तिच्या फियान्स सोबतचा ब्लॅक अँड व्हाइटमधील सेल्फी फोटो पोस्ट केला होता.

फेब्रुवारी २०२० मध्ये, मारियाने टेनिस करिअरमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली होती. त्यावेळेस तिने व्हॅनिटी फेअरसाठी लिहिलेल्या लेखात, खेळातील तिचा वेळ आणि तिला पुढे काय करायचे आहे यावर खुलासा केला होता.

मारियाने ((Tennis Star Maria Sharapova) २० वर्षांच्या टेनिस करिअरमध्ये पाच वेळा ग्रँण्डस्लॅमचा किताब जिंकला आहे. २००५ मध्ये मारियाने टेनिसमध्ये पहिल्या क्रमांकाचे नामांकन मिळवण्यापर्यंत मजल मारली होती. पण हे स्थान तिला फार काळ टिकवता आले नाही. मारिया खेळापेक्षा तिच्या सौंदर्यामुळे नेहमी चर्चेत राहिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news