IPL 2022 : सुसाट फटक्याने फोडली फ्रिजची काच | पुढारी

IPL 2022 : सुसाट फटक्याने फोडली फ्रिजची काच

मुंबई : कोलकाताचा विस्फोटक फलंदाज नितीश राणा याने हैदराबादविरुद्धच्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. राणाच्या फटकेबाजीच्या जोरावर कोलकाताने 175 धावा फलकावर लावल्या. आघाडीची फळी कोसळल्यानंतर राणाने हैदराबादच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. राणाने विस्फोटक फलंदाजीदरम्यान हैदराबादच्या सर्व गोलंदाजांची धुलाई केली. यामध्ये उमरान मलिकचाही समावेश होता. उमरानच्या एका चेंडूला राणाने थेट सीमारेषेबाहेरचा रस्ता दाखवला. हा फटका इतका जबरदस्त होता की, त्यामुळे हैदराबादच्या डगआऊटमधील फ्रिजच्या काचेच्या ठिकर्‍या उडाल्या. त्या फटक्याचेे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सामन्यातील तेरावे षटक टाकण्यासाठी उमरान मलिक आला होता. उमरान मलिकच्या एका चेंडूवर नितीश राणाने षटकार लगावला. या षटकाराने हैदराबादच्या डगआऊटमध्ये असलेल्या फ्रिजची काच फुटली आणि तिथे उपस्थित असलेले खेळाडूसुद्धा क्षणभर विचलित झाले.

 

हेही वाचा

Back to top button