CSK चे 14 कोटींचे नुकसान, ‘या’ खेळाडूमुळे फ्रँचायझीला फटका

पुढारी ऑनलाईन डेस्क : Deepak Chahar : गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आयपीएल २०२२ (IPL 2022) मधील सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. लीगच्या १५ व्या मोसमात आतापर्यंत चेन्नईने चारही सामने गमावले आहेत. पराभवाचे कारण काही प्रमाणात त्यांच्या वेगवान गोलंदाजीतील कमकुवतपणा हे देखील आहे आणि अशा परिस्थितीत संघाला आपला स्टार वेगवान गोलंदाज दीपक चहरची उणीव भासत आहे. CSK ला आज १२ एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) विरुद्ध IPL 2022 मधील पाचवा सामना खेळायचा आहे. पण त्याआधी त्यांना सर्वात मोठा झटका बसला आहे.

चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू खेळाडू दीपक चहर (Deepak Chahar) पाठीच्या दुखापतीमुळे आयपीएलच्या संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी २० (T20I) मालिकेदरम्यान दीपकच्या पायाला दुखापत झाली होती. त्याच्या क्वाड्रिसेप्स स्नायूंना दुखापत झाली होती. दुखापतीतून सावरण्यासाठी तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत गेला. पायाची दुखापत बरी होत होती पण त्यानंतर दीपकच्या पाठीला दुखापत झाल्याचे समोर आले आहे. (IPL 2022)

CSK ने दीपकला १४ कोटींना खरेदी केले होते…

दीपक चहरला (Deepak Chahar) चेन्नई सुपर किंग्जने बंगळुरू येथे झालेल्या आयपीएलच्या मेगा लिलावात १४ कोटींची मोठी बोली लावून विकत घेतले. दीपक गेल्या मोसमापर्यंत चेन्नईचा भाग होता, पण फ्रँचायझीने त्याला कायम ठेवले नाही. यानंतर, दीपकवर पुन्हा मेगा लिलावात मोठी बोली लावून त्याला संघात सामील करून घेण्यात आले. (IPL 2022)

दीपक चहर (Deepak Chahar) चेन्नईसाठी पॉवरप्लेमध्ये प्रमुख गोलंदाज होता आणि तो क्रमवारीत फलंदाजीसह उपयुक्त खेळी खेळण्यात पारंगत आहे. संघाला त्याची उणीव नक्कीच भासणार आहे. दीपकशिवाय चेन्नईचा संघ चार सामने खेळला असून पॉवरप्लेमध्ये त्यांना केवळ दोनच बळी घेता आले आहेत. यादरम्यान चेन्नईच्या गोलंदाजांनी पहिल्या सहा षटकांमध्ये ८.६२ च्या इकॉनॉमी रेटने धावा खर्च केल्या. दीपकच्या जागी मुकेश चौधरीला संधी देण्यात आली आहे, पण चेन्नईच्या पॉवरप्लेमध्ये एकाही गोलंदाजाला विकेट मिळवता आलेली नाही. (IPL 2022)

चेन्नईसाठी पॉवरप्लेमध्ये चहरचे (Deepak Chahar) रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. त्याने पॉवरप्लेमध्ये ५८ डावांमध्ये ४२ विकेट घेतल्या आहेत आणि ७.६१ च्या इकॉनॉमी रेटने धावा केल्या आहेत. याच कारणामुळे चहरला चेन्नईने मेगा लिलावात तब्बल १४ कोटी रुपयांना विकत घेतले. (IPL 2022)

६३ सामन्यात ५९ बळी घेतले

दीपकने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत ६३ सामन्यांत ५९ विकेट घेतल्या आहेत. अलीकडे त्याने बॅटनेही चमत्कार दाखवायला सुरुवात केली होती. यामुळे त्याच्याकडे अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहिले जात होते. त्याने श्रीलंकेविरुद्ध श्रीलंकेत सर्वोत्तम खेळी करत अर्धशतक झळकावले होते आणि भारताला विजय मिळवून दिला. यानंतरही त्याने काही प्रसंगी भारतासाठी महत्त्वपूर्ण खेळी खेळल्या आहेत. (IPL 2022)

Exit mobile version