भारतीय महिला हॉकी टीम ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीत! | पुढारी

भारतीय महिला हॉकी टीम ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीत!

टोकियो; पुढारी ऑनलाईन : भारतीय महिला हॉकी टीम ने कमाल केली आहे. ऑलिम्पिक इतिहासात पहिल्यांदाच महिला हॉकी संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

कर्णधार रानी रामपालच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने ग्रुप स्टेजमध्ये २ सामने जिंकले तर ३ सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्यामुळे उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्यासाठी ग्रेट ब्रिटेन आणि आयर्लंड यांच्यातील सामन्यात आयर्लंडचा पराभव होणे आवश्यक होते.

पूल ए मध्ये भारतीय महिला हॉकी संघाने ५ सामन्यातील २ सामने जिंकले. याबरोबरच संघाला ६ गुण मिळाले. संघ चौथ्या स्थानी होता.

परिणामी आयर्लंडचा संघ आजच्या सामन्यात जिंकला असता तर त्यांचे ६ गुण झाले असते. त्याचबरोबर सरासरीच्या गुणांवर आयर्लंड संघाने भारतीय संघाला मागे टाकलं असतं. पण ग्रेट ब्रिटनने आयर्लंडला २-० ने नमवत भारताला पुढच्या फेरीत पोहोचवण्यात मदत केली.

अधिक वाचा :

चुरशीचा सामना : भारताची दक्षिण आफ्रिकेवर मात…

दरम्यान, अत्‍यंत चुरशीच्‍या सामन्‍यात भारतीय महिला हॉकी संघाने घ विजय नोंदवला. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा ४-३ असा पराभव केला.

आयर्लंडचा पराभव करीत महिला हॉकी संघाने स्‍पर्धेतील आपले आव्‍हान कायम ठेवले होते. आज दक्षिण आफ्रिकाविरुद्‍धचा सामना महत्त्‍वपूर्ण होता.

आज विजयाच्‍या निर्धाराने भारतीय हॉकी संघ मैदानात उतरला. दोन्‍ही संघानी उत्‍कृष्‍ट खेळीचे प्रदर्शन केले.

भारतीय संघाने सामन्‍याची सुरुवात आक्रमक खेळीने केली.

चौथ्‍या मिनिटाला नवनवीत कौरच्‍या पासवर वदंना कटारियाने गोल नोंदवत भारताला आघाडी मिळवून दिली. मात्र तेराव्‍या मिनिटाला गोल करत दक्षिण आफ्रिका संघाने बरोबरी साधली.

पुन्‍हा एकदा वंदनाने गोल करत भारताला पुन्‍हा एकादा आघाडी मिळवून दिली. दोन्‍ही संघाने अत्‍यंत आक्रमक खेळ केला. तिसाव्‍या मिनिटाला दक्षिण आफ्रिकेने गोल नोंदवत सामन्‍यात पुन्‍हा बरोबरी साधली.

तिसर्‍या क्‍वार्टरमध्‍ये रानी रामपालच्‍या पासवर नेहा गोयलने गोल केला. तर पुन्‍हा एकदा आफ्रिका संघाने गोल करत बरोबरी साधली.

अखेर वंदना कटारियाने ४९ मिनिटाला आपला तिसरा आणि संघासाठी निर्णायक चौथा गोल करत सामना भारताच्‍या नावावर केला.

अधिक वाचा :

Back to top button