पी. व्‍ही. सिंधू पराभूत, चायनीज तैपईची यिंग फायनलमध्‍ये | पुढारी

पी. व्‍ही. सिंधू पराभूत, चायनीज तैपईची यिंग फायनलमध्‍ये

पुढारी ऑनलाईन डेस्‍क: टोकिया ऑलिम्‍पिकमध्‍ये सुवर्ण पदकाची दावेदार मानली जाणारी बॅडमिंटनपटू पी. व्‍ही. सिंधू उपांत्‍य सामन्‍यात पराभूत झाली. महिला एकेरी उपांत्‍य फेरीत चायनीज तैपईच्‍या ताय झू यिंग हिने सलग दाेन गेम जिंकत पी. व्‍ही . सिंधू हिचा  पराभव केला. या पराभवाने सिंधूचे अंतिम फेरीत धडक मारुन सुवर्णपदक मिळविण्‍याचे स्‍वप्‍न भंग झाले आहे.

सामन्‍याच्‍या सुरुवातीला सिंधूने आक्रमक खेळ केला. पहिल्‍या गेममध्‍ये आघाडी घेत यिंगवरील दडपण वाढवले. मात्र यिंगने आपला नैसर्गिक खेळ करत बराेबरी साधली. एकाएका गुणांसाठी दाेघींनी उत्‍कृष्‍ट खेळाचे प्रदर्शन केले. अत्‍यंत अटीतटीच्‍या झालेल्‍या पहिला गेम ताय झू यिंगने २१-१८ असा जिंकला.

पहिला अत्‍यंत अटीतटीचा झालेला गेम गमावल्‍यानंतरही सिंधूने आपला आक्रमक खेळ दुसर्‍या गेममध्‍येही कायम ठेवला. मात्र यिंगनेही आक्रमक खेळी करत आघाडी घेतली. तिने दुसरा गेम १२-२१असा जिंकत सामना आपल्‍या नावावर करत फायनलमध्‍ये धडक मारली.

जागतिक क्रमवारी सिंधु सातव्‍या स्‍थानी आहे. यापूर्वी सिंधू आणि ताइ त्‍झू यिंग यांच्‍यात एकुण १८ सामने झाले होते. यातील १३ सामने हे यिंग हिने जिंकले होते. तर पाच सामन्‍यांमध्‍ये सिंधुने बाजी मारली होती. तसेच मागील तीन सामन्‍यांमध्‍ये सिंधु ही ताइ यिंग विरुद्‍धचे सामने पराभूत झाली होती.

२०१६च्‍या रियो ऑलिम्‍पिक स्‍पर्धेतही सिंधुही उपांत्‍य फेरीत सामना जिंकून अंतिम फेरीत धडक मारली होती.

टोकियो ऑलिम्‍पिकमध्‍ये उपांत्‍यपूर्व सामन्‍यामध्‍ये सिंधुने जपानच्‍या यामागुची २१-१३, २२-२० असा सलग दोन गेममध्‍ये पराभव केला होता.

आता कास्‍य पदकासाठी होणार लढत

पी. व्‍ही. सिंधूचा उपांत्‍य फेरीत पराभव झाला आहे. आता कास्‍य पदकासाठी तिचा सामना चीनच्‍या बिंग जियाओ हिच्‍याबरोबर होईल.

हे ही वाचलं का?

Back to top button