Ben stokes : बेन स्टोक्सच्या अचानक घेतलेल्या 'या' निर्णयाने क्रिकेट विश्वाला मोठा धक्का | पुढारी

Ben stokes : बेन स्टोक्सच्या अचानक घेतलेल्या 'या' निर्णयाने क्रिकेट विश्वाला मोठा धक्का

लंडन; पुढारी ऑनलाईन : अवघ्या काही दिवसांवर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. ही कसोटी मालिका तोंडावर असताना इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा महत्वाचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स (Ben stokes) अनिश्चित काळासाठी क्रिकेटमधून बाहेर थांबणार आहे. याबाबतची माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली आहे.

४ ऑगस्टपासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे.

बेन स्टोक्सने ( Ben stokes) भारत आणि इंग्लंड दरम्यान होणाऱ्या मालिकेबरोबर तो अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतल्याचे त्याने सांगितले. स्टोक्सच्या या निर्णयाने क्रिकेट जगतात वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. मानसिक स्वास्थ्य आणि बोटाला झालेली दुखापत यामुळेही स्टोक्सने क्रिकेटमधून विश्रांती घेतल्याची चर्चा आहे. यावर्षी झालेल्या आयपीएल २०२१ दरम्यान स्टोक्सच्या बोटाला दुखापत झाली होती. झेल घेताना त्याच्या बोटाला चेंडू लागल्याने बोट फ्रॅक्चर झाले होते.

तसेच इंग्लंड क्रिकेट मंडळाकडून याबाबत एक पत्र सादर केले आहे. बेन स्टोक्सने भारताविरुद्ध पुढील आठवड्यात सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. आरोग्याबाबत असलेल्या तक्रारीमुळे स्टोक्सने हा निर्णय घेतला आहे. याचबरोबर त्याचे मानसिक स्वास्थ ठीक नसल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

क्रेग ओव्हरटनला संधी

भारताविरुद्ध होणाऱ्या पहिल्या दोन कसोटी मालिकेसाठी इंग्लंडने बेन स्टोक्सच्या जागी क्रेग ओव्हरटनचा संघात समावेश केला आहे. १७ जणांचा संघ जाहीर केला होता, त्यामध्ये स्टोक्सचा समावेश होता. आता त्याच्या जागी क्रेग ओव्हटरनचा समावेश करण्यात आला आहे.

वन डे, टी20 आणि कसोटी कारकीर्द

स्टोक्सने २०११ साली आयर्लंड विरुद्ध पहिला वन डे सामना खेळला. स्टोक्स २०११ साली वेस्ट इंडिजविरुद्ध टी20 मध्ये मैदानात उतरला.

वन डे मध्ये त्याने १०१ सामन्यांत २८७१ धावा ठोकल्या. यामध्ये ३ शतके आणि ७४ विकेट्सही घेतल्या आहेत.

२०१९ मध्ये इंग्लंडने वन डे विश्वचषक जिंकला. स्टोक्सच्या जबरदस्त खेळीने इंग्लंडला शेवटचा सामना जिंकून दिला.

बेन स्टोक्स ३४ टी२० सामने खेळला आहे. या १९ विकेट स्टोक्सच्या नावावर आहेत. टी२० मध्ये ४४२ धावा केल्या आहेत.

बेन स्टोक्स हा सध्याच्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत सर्वोत्तम क्रिकेटपट्टू म्हणून ओळखला जातो.

स्टोक्सने २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडिलेटमध्ये कसोटी पदार्पण केले.

स्टोक्सने आतापर्यंत ७१ कसोटीमध्ये १० शतके केली आहेत.

त्याच्या नावावर कसोटीत ४६३१ धावा आहेत.

कसोटीत स्टोक्सने १६३ विकेट घेतल्या. यामध्ये ४ वेळा ५ विकेट्सचा समावेश आहे.

हे ही पाहा :

Back to top button