महिला हॉकी संघाने दक्षिण आफ्रिकेला नमवले, वंदना कटारियाची हॅटट्रिक | पुढारी

महिला हॉकी संघाने दक्षिण आफ्रिकेला नमवले, वंदना कटारियाची हॅटट्रिक

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : टोकियो ऑलिम्‍पिकमध्‍ये आज अत्‍यंत चुरशीच्‍या सामन्‍यात भारतीय महिला हॉकी संघ विजयी ठरला.  दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारतीय महिला हॉकी संघाने ४-३ असा विजय नाेंदवला. आज सायंकाळी आयर्लंड विरुद्‍ध ब्रिटन यांच्‍यामध्‍ये सामना होणार आहे. यामध्‍ये आयर्लंडचा पराभव झाल्‍यास भारतीय हॉकी संघ उपांत्‍यपूर्व फेरी गाठेल.

आयर्लंडचा पराभव करीत महिला हॉकी संघाने स्‍पर्धेतील आपले आव्‍हान कायम ठेवले होते. आज दक्षिण आफ्रिकाविरुद्‍धचा सामना महत्त्‍वपूर्ण होता.

आज विजयाच्‍या निर्धाराने भारतीय हॉकी संघ मैदानात उतरला. दोन्‍ही संघानी उत्‍कृष्‍ट खेळीचे प्रदर्शन केले.

भारतीय संघाने सामन्‍याची सुरुवात आक्रमक खेळीने केली.

चौथ्‍या मिनिटाला नवनवीत कौरच्‍या पासवर वदंना कटारियाने गोल नोंदवत भारताला आघाडी मिळवून दिली. मात्र तेराव्‍या मिनिटाला गोल करत दक्षिण आफ्रिका संघाने बरोबरी साधली.

पुन्‍हा एकदा वंदनाने गोल करत भारताला पुन्‍हा एकादा आघाडी मिळवून दिली. दोन्‍ही संघाने अत्‍यंत आक्रमक खेळ केला. तिसाव्‍या मिनिटाला दक्षिण आफ्रिकेने गोल नोंदवत सामन्‍यात पुन्‍हा बरोबरी साधली.

तिसर्‍या क्‍वार्टरमध्‍ये रानी रामपालच्‍या पासवर नेहा गोयलने गोल केला. तर पुन्‍हा एकदा आफ्रिका संघाने गोल करत बरोबरी साधली.

अखेर वंदना कटारियाने ४९ मिनिटाला आपला तिसरा आणि संघासाठी निर्णायक चौथा गोल करत सामना भारताच्‍या नावावर केला.

वंदना कटारियाची हॅटट्रिक

Vandana Katariya
ऑलिम्‍पिकमध्‍ये हॅटट्रिक नोंदवणारी वंदना कटारिया पहिली खेळाडू ठरली आहे.

‘वंदना कटारिया हिने आज तीन गोल केले. ऑलिम्‍पिकच्‍या सामन्‍यात हॅटट्रिक नोंदवणारी वंदना पहिली खेळाडू ठरली आहे.

… तर भारतीय हॉकी संघ उपांत्‍यपूर्व फेरीत

टोकियो ऑलिम्‍पिकमधील महिला हॉकीतील साखळी सामने आज संपतील. या फेरीत भारतीय संघाने एकुण ५ सामन्‍यांमध्‍ये दोन विजय नोंदवले आहेत.

सध्‍या भारत चौथ्‍या स्‍थानी आहे. तर पाचही सामने पराभूत झालेल्‍या दक्षिण आफ्रिकेचा संघ हा अखेरच्‍या स्‍थानावर आहे.

नेदरलँड, जर्मनी, ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंडने आतापर्यंत प्रत्‍येकी चार सामने खेळले आहेत. यामध्‍ये नेदरलँड, आणि जर्मनी या संघांचा उपात्‍यपूर्व फेरीतील प्रवेश निश्‍चित झाला आहे.

आज सायंकाळी आयर्लंड विरुद्‍ध ब्रिटन यांच्‍यामध्‍ये सामना हाेईल. यामध्‍ये आयर्लंडचा पराभव झाल्‍यास भारतीय हॉकी संघ उपांत्‍यपूर्व फेरी गाठेल.

हेही वाचलं का? 

पाहा व्‍हिडीओ :फुकट बिर्याणी मागविणाऱ्या महिला डीसीपीच्या ऑडिओ क्लीपची होणार चौकशी

Back to top button