sunrisers hyderabad : विलियम्सनच्या चुका आणि हैदराबादचा फज्जा | पुढारी

sunrisers hyderabad : विलियम्सनच्या चुका आणि हैदराबादचा फज्जा

मुंबई; वृत्तसंस्था : आयपीएलमध्ये मंगळवारी सनरायझर्स हैदराबादला (sunrisers hyderabad) राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. आता त्यामागची नेमकी कारणे पुढे आली आहेत.

सनरायझर्सकडून (sunrisers hyderabad) पहिल्यात षटकात भुवनेश्‍वर कुमारने दमदार गोलंदाजी केली. यावेळी त्याने केवळ एकच धाव दिली. राजस्थानचा तगडा खेळाडू जोस बटलरला याच षटकात त्याने बाद केले. पण तोच चेंडू नो बॉल ठरल्याने हैदराबादला मोठा तोटा झाला. वॉशिंग्टन सुंदर हा सनरायझर्सचा मुख्य फिरकीपटू असून तो या सामन्यात खास करामत करू शकला नाही. त्याने तीन षटकांत एकूण 47 धावा मोजल्या. याच्या उलट राजस्थानचे फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि रविचंद्रन अश्‍विन यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. खेरीज राजस्थानच्या सर्वच फलंदाजांनी झकास फलंदाजी केली आणि आपल्या संघाला 200 च्या पार पोहोचवले.

यात बटलरने 35, यशस्वी जैस्वालने 20, संजू सॅमसनने 55, देवदत्त पडिक्‍कलने 41 आणि शिमरॉन हेटमायरने 32 धावा केल्या. सनरायझर्सचा (sunrisers hyderabad) कर्णधार केन विलियम्सनने एडन मार्करला पाचव्या क्रमांकावर खेळवले. त्याने संघासाठी नाबाद 57 धावा केल्या. पण, त्याला वरच्या फळीत खेळवले असते तर त्याने अधिक धावा ठोकल्या असत्या. हे कमी म्हणून की काय हैदराबादचा कर्णधार असलेला विलियम्सन अवघ्या दोन धावांवर स्लीपमध्ये झेल देऊन तंबूचा रस्ता धरला. मात्र त्याचा झेल जेव्हा देवदत्त पडिक्‍कलने घेतला तेव्हा पडिक्‍कलचा हात मैदानाला लागल्यासारखे चित्र दिसले होते. तरीही विलियम्सनला बाद देण्यात आले. त्यामुळे हैदराबादचे चाहते हिरमुसले होते.

Back to top button