#GT vs LSG : गुजरातच लखनौवर विजय! | पुढारी

#GT vs LSG : गुजरातच लखनौवर विजय!

पुढारी ऑनलाईन डेस्क

गुजरात टायटन्सने आयपीएलची सुरुवात विजयाने केली. आपल्या पहिल्याच सामन्यात त्यांनी लखनौ सुपर जायंट्सचा पाच गडी राखून पराभव केला. नाणेफेक गमावल्या नंतर प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्सने 20 षटकांत 6 गडी गमावून 158 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सने 19.4 षटकांत पाच गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला.

गुजरातला पाचवा धक्का

18व्या षटकात वेगवान गोलंदाज आवेश खानने डेव्हिड मिलरला केएल राहुलकडे झेलबाद केले. मिलरला 21 चेंडूत 30 धावा करता आल्या. त्यात एक चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. 18 षटकांनंतर गुजरातने पाच गड्यांच्या मोबदल्यात 139 धावा केल्या.

गुजरातला चौथा धक्का

गुजरात टायटन्सला 78 च्या स्कोअरवर चौथा धक्का बसला. दीपक हुड्डा फलंदाजीनंतर गोलंदाजीतही चमत्कार करताना दिसला. त्याने 12व्या षटकात मॅथ्यू वेडला क्लीन बोल्ड केले. वेडला 29 चेंडूत 30 धावा करता आल्या. 12 षटकांनंतर गुजरातने 4 गड्यांच्या मोबदल्यात 79 धावा केल्या.

गुजरातचा कर्णधार हार्दिक पॅव्हेलियनमध्ये परतला

गुजरातला 11व्या षटकात 72 धावांवर तिसरा धक्का बसला. कर्णधार हार्दिक पंड्या 28 चेंडूत 33 धावा करून बाद झाला. त्याचा भाऊ कृणाल पंड्याने त्याला बाद केले. क्रुणालने हार्दिकला मनीष पांडेकरवी झेलबाद केले. यानंतर क्रुणालची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. त्याने तोंडावर हात ठेवला होता. 11 षटकांनंतर गुजरातने तीन गड्यांच्या मोबदल्यात 75 धावा केल्या. हार्दिकने मॅथ्यू वेडसोबत 48 चेंडूत 57 धावांची भागीदारी केली.

गुजरात टायटन्सला दुसरा धक्का

विजय शंकर ६ चेंडूमध्ये चार धावा करत तंबूत परतला.

लखनौ सुपर जायंट्सने गुजरात टायटन्ससमोर 159 धावांचे लक्ष्य ठेवले होते. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना लखनौने 20 षटकांत 6 बाद 158 धावा केल्या. सामन्यात अनेक टर्निंग पॉइंट्स आले. आधी गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा कहर दिसला. त्याने पहिल्या स्पेलच्या तीन षटकांत तीन बळी घेतले. शमीने लखनौचा कर्णधार आणि आयपीएल 2022 मधील सर्वात महागडा खेळाडू (17 कोटी) केएल राहुलला सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर यष्टिरक्षक मॅथ्यू वेडच्या हाती झेलबाद केले. यानंतर शमीने दुसऱ्या षटकात क्विंटन डी कॉक (7) आणि तिसऱ्या षटकात मनीष पांडेला (6) पाठवले. वरुण आरोनने एव्हिन लुईसला (10) शुभमन गिलकरवी झेलबाद केले.

29 धावांवर लखनौने चार विकेट गमावल्या होत्या. यानंतर दीपक हुडा आणि युवा आयुष बडोनीने डावाची धुरा सांभाळली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 68 चेंडूत 87 धावांची भागीदारी केली. या काळात दीपक हुडाने आयपीएल कारकिर्दीतील चौथे अर्धशतक झळकावले. राशिद खानने दीपक आणि आयुषची भागीदारी तोडली. त्याने दीपक हुडाला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. हुड्डा 41 चेंडूत 55 धावा करून बाद झाला. या खेळीत सहा चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता.

यानंतर कृणाल पांड्या आणि आयुष बडोनी यांनी लखनौला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले. बडोनीने आयपीएल पदार्पणाच्या सामन्यातच पहिले अर्धशतक झळकावले. तो 41 चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 54 धावा करून बाद झाला. बडोनी आणि कृणाल यांनी सहाव्या विकेटसाठी 23 चेंडूत 40 धावांची भागीदारी केली.

क्रुणाल 13 चेंडूत 21 धावा करून नाबाद राहिला आणि दुष्मंथा चमीराने एका चेंडूवर एक धाव घेतली. गुजरातकडून शमीने तीन बळी घेतले. त्याचवेळी वरुण आरोनने दोन विकेट घेतल्या. राशिद खानने एक विकेट घेतली. शमीने पॉवरप्लेमध्ये पहिल्यांदाच तीन विकेट घेतल्या.

मनीष पांडे क्लीन बोल्ड

आयपीएलचा सर्वात महागडा संघ लखनौ सुपर जायंट्सने पहिल्या पाच षटकात अवघ्या २९ धावांत चार विकेट गमावल्या. पाचव्या षटकात मोहम्मद शमीने मनीष पांडेला क्लीन बोल्ड केले. मनीषला सहा धावा करता आल्या. याआधी शमीने लखनऊचा कर्णधार आणि या आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू केएल राहुलला माघारी धाडले होते. यासोबतच क्विंटन डी कॉकही क्लीन बोल्ड झाला. शमीला तीन आणि वरुण आरोनलाही यश मिळाले आहे. आरोनने एविन लुईसला शुबमन गिलकरवी झेलबाद केले.

Image

एविन लुईस बाद

लखनौ सुपर जायंट्सला २० च्या स्कोअरवर तिसरा धक्का बसला. वेगवान गोलंदाज वरुण आरोनने एविन लुईसला शुभमन गिलकरवी झेलबाद केले. गिलने मिड-विकेटवर डायव्हिंग करत शानदार झेल घेतला. या झेलने १९८३ च्या विश्वचषक स्पर्धेतील कपिल देवच्या झेलची आठवण करून दिली. लुईस नऊ चेंडूत १० धावा काढून बाद झाला.

Image

लखनौला दुसरा धक्का

१३ च्या स्कोअरवर लखनौ सुपर जायंट्सला दुसरा धक्का बसला. मोहम्मद शमीच्या घातक गोलंदाजीसमोर लखनौचे फलंदाज अपयशी ठरत आहेत. शमीने आयपीएल २०२२ मधील सर्वात महागडा खेळाडू आणि लखनऊचा कर्णधार केएल राहुल (०) याला सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर लखनौच्या डावाच्या तिसऱ्या षटकात क्विंटन डी कॉकही क्लीन बोल्ड झाला. लखनौचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले.

Image

कर्णधार राहुल बाद

सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर लखनौ सुपर जायंट्सला धक्का बसला. डावाच्या पहिल्याच चेंडूवर मोहम्मद शमीने लखनऊचा कर्णधार केएल राहुलला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. शमीचा आऊट स्विंग बॉल राहुलच्या बॅटला लागला आणि यष्टिरक्षक मॅथ्यू वेडच्या हातात गेला.

LSG चा संघ

केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), एविन लुईस, मनीष पांडे, दीपक हुडा, क्रुणाल पांड्या, मोहसिन खान, आयुष बदाउनी, दुष्मंथा चमिरा, रवी बिश्नोई, आवेश खान.

GT चा संघ

शुभमन गिल, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), विजय शंकर, अभिनव मनोहर, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, लॉकी फर्ग्युसन, वरुण आरोन, मोहम्मद शमी.

Back to top button