Olympics2021; ऑलिम्पिकचे दिमाखदार उद्घाटन

स्टेडियम रिकामे, मोजकेच मान्यवर, कोरानाचे सावट तरी उत्साह तसभूरही कमी नाही. जागतिक क्रीडाक्षेत्राच्या अंर्तमनाला साथ देत 32 व्या ऑलिम्पिक (Olympics2021) स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन शुक्रवारी टोकियोत झाले.

The Olympic oath has been updated for the Tokyo Games, with athletes swearing their commitment to inclusion, equality, and non-discrimination. [Naoki Ogura/Reuters]

जपानी वैभवशाली परंपरा, फुजी पर्वतावरील जिवंत ज्वालामुखीचा रंगमंच आणि सूर्यफूलाची क्रीडाज्योत प्रकट करीत जगभरातील आलेल्या प्रतिकूल काळातही क्रीडापटूंचा शर्थीने लढत रहा, असा संदेश देत जगातील सर्वोत्तम क्रीडा सोहळ्याचा टोकियोत बिगुल वाजला.

अधिक वाचा

टोकियो ऑलिम्पिक मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा आविष्कार

Tokyo Olympics 2021 ;ऑलिम्पिक स्पर्धेच्या लोगोमध्ये पाच रिंग का असतात ?

कोरोनाच्या दाट छायेत ऑलिम्पिक (Olympics2021)  होणार की नाही या वर्षभरापासून सुरू असलेल्या प्रश्‍नांना पूर्णविराम देत जपानने शानदार उद्घाटन सोहळा साजरा केला. लंडन, रियो सारखाच भव्य आणि अपूर्व असाच टोकियोचा आटोपशीर समारंभ होता.

टोकियोमधील नॅशनल स्टेडियममध्ये पुन्हा एकदा ऑलिम्पिकची क्रीडाज्योत प्रकटली. यापूर्वी याच मैदानात 1964 मध्ये ऑलिम्पिकचा अपूर्व असा उद्घाटन सोहळा रंगला होता.

The ceremony wove together references to both Japan's traditional crafts and its globally adored video games, with athletes entering to theme music from famed titles. [Fabrizio Bensch/Reuters]

संगीत, नृत्याविष्काराच्या साथीने ऑलिम्पिकमधील मानवता, मैत्रीचा संदेश देणार्‍या टोकियो ऑलिम्पिकचे उद्घाटन जपानचे राजे नारुहितो यांच्या हस्ते झाले.

अधिक वाचा

टोकियो ऑलिम्पिक : स्पर्धेतील सर्वात तरुण आणि वयस्कर खेळाडू कोण?

olympics2021; जाणून घेऊया ऑलिम्पिकचा इतिहास

जमिनीला दोन हात टेकवून असलेली महिला खेळाडू हळूहळू उभी रहाते अन् तिच्या सावलीत पालवी फुटेलेली दोन पाने दर्शवित पर्यावरणाचा संदेश देणार्‍या कलाविष्काराने उद्घाटनाची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली.

खेळाडूंच्या अंर्तमनातील प्रकाशाचा शोध घेणारा कार्यक्रमही डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.

खेळाडूंचे संचलन, ध्वजारोहण, शपथ आणि क्रीडाज्योत प्रज्वलन ही ऑलिम्पिक उद्घाटनाची परंपराही थाटात पार पडली. त्यापूर्वी ऑलिम्पिक जीवनगौरव पुरस्कारानेे बांगला देशचे नोबल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांचा गौरव करण्यात आला.

The Tokyo Olympics opened with a ceremony reflecting a Games like no other, walking a fine line between celebrating the world's best athletes while acknowledging the pandemic. [Eugene Hoshiko/AP]

जपानी भाषेतील क्रमवारीनुसार झालेल्या संचलनात भारतीय पथक 21 व्या स्थानावर होते.ऑलिम्पिक पदकविजेती मेरी कोम व भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनजितसिंग यांनी तिरंगा हाती घेत 18 खेळाडूंच्या सोबत संचलन केले.

सोनेरी रंगाच्या चुडिदारात महिला तर निळ्या सूटातील पुरुष संघ लक्ष वेधून घेत होता. संचलनात जल्लोष नसला तरी मास्क परिधान करीत प्रत्येक खेळाडूंच्या चालण्यातून कोरोनाची धीरगंंभीरता झळकत होती.

विक्रमी 33 क्रीडा प्रकारात 205 देशांतील 11,326 खेळाडू टोकियो ऑलिम्पिकच्या रणभूमीत आता पदकाची शर्थ करताना दिसणार आहेत.

हे वाचलंत का? 

टोकियो ऑलिम्पिक पदकासाठी कोल्हापूरचे नेमबाज सज्ज

ऑलिम्पिक बेड अँटी सेक्स, अमेरिकन धावपटूची टीका

ऑलिम्पिक : खेळाडू १२५, कोण बनेगा चॅम्पियन?

Back to top button