'या' वक्तव्यामुळे सुरेश रैना 'क्लीन बोल्ड' ; सोशल मीडियाने घेतला क्लास

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन: भारतीय संघाचा माजी खेळाडू सुरेश रैना एका नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याच्‍या एका विधानामुळे सोशल मीडियावर चांगलाच वाद निर्माण झाला आहे.

नेमकं काय घडलं?

सुरेश रैना सध्या तामिळनाडु प्रीमियर लीग पाचव्या सीजनमध्ये सुरवातीला समालोचन टीमचा हिस्सा बनला होता. दरम्यान, एका समालोचनाने सुरेश रैनाला दक्षिण भारताच्या संस्कृतीवरून प्रश्न उपस्थित केला.

त्यावेळी उत्तर देताना रैनाने ब्राम्हण असल्याने चेन्नईच्‍या संस्कृतीमध्‍ये सहज रुळलो असल्याचे म्हटले.

रैनाच्या याच उत्तरामुळे सोशल .मीडियावर वाद निर्माण झाला आहे. तर काही युजर्स त्याला पाठिंबादेखील दर्शवत आहेत.

अधिक वाचा

नेमकं काय म्हटलं आहे सुरेश रैना?

मला वाटते मी ही ब्राम्हण आहे. चैन्नई येथे २००४ पासून खेळत आहे. दक्षिण भारतातील संस्कृती मला खूप आवडली आहे. मी अनिरूद्ध श्रीकांतसोबत खेळलाे. सुब्रमण्यम बद्रीनाथ, एल बालाजी यांच्यासोबतदेखील खेळलो आहे.


मी २००८ पासून चैन्नई सुपर किंग्ज संघाचा हिस्सा आहे. असे रैनाने उत्तरामध्ये म्हटले आहे. चैन्नई येथे रैनाला ‘चिन्ना थाला’ओळखतात.

अधिक वाचा

युजर्सकडून रैना ट्रोल

रैनाने स्वतःला ब्राम्हण म्हटल्याचे काही युजर्सच्या पचनी पडलेले नाही. एका युजरने त्याला ट्रोल केले आहे.

सुरैश रैना याला लाज वाटली पाहिजे. असे वाटते की अद्याप रैनाला चेन्नईची संस्कृती समजलेली नाही, असे त्‍याने म्‍हटले आहे.

रैनाने ब्राम्हण या शब्दाचा वापर करायला नको होता, असे एका युजरने म्हटले आहे.

रैनाने मागील वर्षी १५ ऑगस्टला धोनीच्या निवृत्तनंतर काही तासांमध्‍येच आंतरराष्‍ट्रीय  क्रिकेटला अलविदा केले हाेते. आता तो ‘युएई’मध्ये उर्वरित आयपीएलच्या १४ हंगामातील सामन्यांमध्ये दिसणार आहे.

हे वाचलतं का?

Back to top button