Shimron Hetmyer संघाबाहेर : भारत दौर्‍यासाठी इंडिज टी-20 संघाची घोषणा | पुढारी

Shimron Hetmyer संघाबाहेर : भारत दौर्‍यासाठी इंडिज टी-20 संघाची घोषणा

सेंट जोन्स ; वृत्तसंस्था : आक्रमक फलंदाज शिमरोन हेटमायर (Shimron Hetmyer) फिट नसल्याने भारताविरुद्ध होणार्‍या टी-20 मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघात त्याची निवड करण्यात आलेली नाही. वेस्ट इंडिजने भारतात होणार्‍या टी-20 मालिकेसाठी कायरन पोलार्डच्या नेतृत्वाखाली 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.

तीन सामन्यांची टी-20 मालिका 16, 18 आणि 20 फेब्रुवारीला कोलकातामध्ये खेळविण्यात येणार आहे. त्यापूर्वी अहमदाबादमध्ये सहा, नऊ आणि 11 फेब्रुवारीला तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळविण्यात येत आहे. वेस्ट इंडिज संघाने पोलार्डच्या नेतृत्वाखाली यापूर्वीच एकदिवसीय संघाची घोषणा केलेली आहे.

पोलार्ड, फॅबियन एलन, डॅरेन ब्रावो, जेसन होल्डर, शाई होप, अकील हुसैन, ब्रेंडन किंग, निकोलस पूरन, रोमारीयो शेफर्ड, ओडियन स्मिथ आणि हेडन वॉल्श यांचा दोन्ही संघात समावेश आहे. फिट नसल्याने हेटमायरची (Shimron Hetmyer) निवड करण्यात आलेली नाही.

या महिन्याच्या सुरुवातीला वेस्ट इंडिजचे प्रशिक्षक फील सिमन्स यांनी शिमरोन हेटमायर (Shimron Hetmyer) याच्या फिटनेसबाबत नाराजी व्यक्‍त केली होती. 25 वर्षीय हा फलंदाज इंग्लंड विरुद्धच्या मालिकेपूर्वी फिटनेस चाचणीत अपयशी झाला होता.

वेस्ट इंडिज टी-20 संघ :

कायरन पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन (उपकर्णधार), फॅबियन एलन, डॅरेन ब्रावो, रॉस्टन चेज, शेल्डन कॉटरेल, डॉमिनिक ड्रेक्स, जेसन होल्डर, शाई होप, अकील हुसैन, ब्रेंडन किंग, रोवमॅन पॉवेल, रोमारियो शेफर्ड, ओडीयन स्मिथ, काईल मेयर्स, हेडन वॉल्श ज्युनियर

वेळापत्रक

एकदिवसीय मालिका (अहमदाबाद)
पहिला सामना – 6 फेब्रुवारी
दुसरा सामना – 9 फेब्रुवारी
तिसरा सामना – 11 फेब्रुवारी

टी-20 मालिका (कोलकाता)

पहिला सामना – 16 फेब्रुवारी
दुसरा सामना – 18 फेब्रुवारी
तिसरा सामना – 20 फेब्रुवारी

Back to top button