India VS West Indies : भारताविरुद्धच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघाची घोषणा | पुढारी

India VS West Indies : भारताविरुद्धच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघाची घोषणा

मुंबई; पुढारी ऑनलाईन

आफ्रिका दौऱ्यावरुन रिकाम्या हाती परतणारा भारतीय संघ (India VS West Indies) आता देशांतर्गत वेस्ट इंडिज (West Indies Cricket Team) संघाशी भिडणार आहे. वेस्ट इंडिज संघ भारताच्या दौऱ्यावर येत आहे. भारत वेस्ट इंडिजविरुद्ध तीन एकदिवसीय सामने आणि तीन टी-२० सामने खेळणार आहे. नुकतेच वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने भारत दौऱ्यावर येणाऱ्या वेस्ट इंडिज संघाची घोषणा केली. अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड (Kieron Pollard) यांच्याकडे संघांचे नेतृत्त्व सोपवण्यात आले आहे.

किरॉन पोलार्डकडे ( India VS West Indies ) संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. जलतगती गोलंदाज केमार रोच, एनक्रमाह बोनर आणि ब्रॅडन किंग यांचे संघात पुनरागमन झाले आहे. बीसीसीआयने एकदिवसीय मालिका आणि टी २० मालिकेसाठी दोन्ही संघाची घोषणा केली आहे.

कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वाखाली संघाची निवड करण्यात आली आहे. एकदिवसीय सामन्यांसाठी चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) पुनरागमन केले आहे. शिवाय एकदिवसीय संघामध्ये वॉश्गिंटन सुंदर (washington sundar) , दीपक हुड्डा (deepak hooda) आणि आवेश खान (avesh khan) यांना संधी मिळाली आहे. तर टी २० मालिकेसाठी रवि बिश्नोई, वॉश्गिटंन सुंदर, आवेश खान आणि हर्षल पटेल यांना संधी मिळाली आहे.

एकदिवसीय मालिकेसाठी निवडण्यात आलेला वेस्ट इंडिज संघ

किरॉन पोलार्ड (कर्णधार), फॅबियन ॲलन, एनक्रुमाह बोनर, डॅरेन ब्रावो, शमारह ब्रुक्स, जेसन होल्डर, शाई होप, अकील हुसैन, अल्जारी जोसेफ, ब्रँडन किंग, निकोलस पूरन, केमार रोच, रोमारियो शेफर्ड, ओडियन स्मिथ आणि हेडन वॉल्श ज्युनियर.

एकदिवसीय मालिकेसाठी निवडण्यात आलेला भारतीय संघ 

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक हुड्डा, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉश्गिंटन सुंदर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान.

टी २० मालिकेसाठी निवडण्यात आलेला भारतीय संघ 

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वेंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवि बिश्नोई, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, वॉश्गिंटन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान आणि हर्षल पटेल.

एकदिवसी मालिका

  • पहिला सामना – ६ फेब्रुवारी (अहमदाबाद)
  • दुसरा सामना – ९ फेब्रुवारी (अहमदाबाद)
  • तिसरा सामना – १२ फेब्रुवारी (अहमदाबाद)

टी २० मालिका

  • पहिला सामना – १५ फेब्रुवारी ( कोलकाता )
  • दुसरा सामना – १८ फेब्रुवारी ( कोलकाता )
  • तिसरा सामना – २० फेब्रुवारी ( कोलकाता )

Back to top button