रोहितच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट, झालं असं की... | पुढारी

रोहितच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट, झालं असं की...

पुढारी ऑनलाईन डेस्क : वेस्ट इंडिजविरुद्धच्या मलिकेपूर्वी टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी आहे. वनडे आणि टी २० संघांचा नवा कर्णधार रोहित शर्मा (rohit sharma) फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहितने यो-यो चाचणी यशस्वीपणे पास केली आहे.

रोहित शर्माच्या डाव्या पाया झाली होती दुखापत…

रोहित शर्मा (rohit sharma) दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी सराव शिबिरात जखमी झाला. सराव करताना त्याच्या डाव्या पायातील स्नायू दुखावले होते. त्यानंतर तो संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला. पण आता फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला सुरू होणा-या वेस्ट इंडिज मालिकेपूर्वी तो संघासोबत असेल अशी अपडेट मिळत असून तो यो-यो फिटनेस चाचणी पास झाल्याने समोर आली आहे. ही टीम इंडियासाठी आनंदाची बातमी आहे.

रोहित शर्माने मुंबईत आधीच प्रशिक्षण सुरू केले होते… (rohit sharma)

फिटनेस टेस्ट पास होण्याआधीच रोहित शर्माने मुंबईत प्रशिक्षण सुरू केले होते. रोहित शर्माची फिटनेस चाचणी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये झाली. चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याला खेळण्यासाठी औपचारिक मान्यता मिळाली आहे.

रोहित शर्मा कसोटीचा कर्णधार होऊ शकतो..

रोहित शर्माला (rohit sharma) कसोटी कर्णधार बनवणे जवळपास निश्चित असल्याचे मानले जात आहे. तथापि, २०२२ मध्ये होणा-या टी २० आणि २०२३ मध्ये होणा-या वनडे विश्वचषक स्पर्धेत तो संघाचे नेतृत्व करेल अशी अपेक्षा आहे. बीसीसीआयही याबाबत त्याच्याकडे या मोठ्या स्पर्धांमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी आणि कार्यभार रोहितकडे सोपवण्यासंबंधी विचार करत आहे. दरम्यान, कर्णधार म्हणून केएल राहुलला पहिल्या मालिकेत अपयश आले. भविष्यात तो संघाचे नेतृत्व करण्यासाठी परिपक्व होईपर्यंत त्याला रोहितच्या मार्गदर्शनाखाली राहावे लागेल, अशी शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.

भारत-वेस्ट इंडिज मालिका ६ फेब्रुवारीपासून सुरू होणार…

वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात तीन सामन्यांची वनडे आणि टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. वेस्ट इंडिजचा भारत दौरा ६ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. अहमदाबादमध्येच तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. तर तीन सामन्यांची टी-२० मालिका फक्त कोलकात्यात खेळवली जाणार आहे.

Back to top button