टोकियो ऑलिम्पिक पदकासाठी कोल्हापूरचे नेमबाज सज्ज - पुढारी

टोकियो ऑलिम्पिक पदकासाठी कोल्हापूरचे नेमबाज सज्ज

कोल्हापूर ; सागर यादव : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापुरात ‘क्रीडानगरी’चा भक्कम पाया रचला. यामुळे कोल्हापुरात विविध खेळांची शतकी परंपरा निर्माण झाली. यातून अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू घडले. हा वारसा जपत कोल्हापूरचे तीन युवा नेमबाज टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये पदकांचा वेध घेण्यासाठी सज्ज झाले आहेत.

महाराष्ट्र राज्य युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने ठिकठिकाणी सेल्फी पाईंट व फलक उभे करून नेमबाजांना भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

राज्यातील 8 पैकी 3 कोल्हापूरचे खेळाडू

‘टोकियो ऑलिम्पिक 2020’ साठी राज्यातील निवड झालेल्या 8 खेळाडूंची भारतीय संघात निवड झाली आहे. यात एकट्या कोल्हापूर जिल्ह्याचे तीन तर उर्वरित महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांतील पाच खेळाडूंचा समावेश आहे. कोल्हापुरातील तेजस्विनी सावंत (शूटिंग – 50 मीटर थ्री रायफल पोझिशन), राही जीवन सरनोबत (शूटिंग 25 मीटर पिस्तूल) आणि स्वरुप महावीर उन्हाळकर (पॅरा शूटिंग 10 मीटर रायफल) हे तिघे प्रतिनिधित्व करणार आहेत.

रायफल शूटिंग 10 मीटर एअर रायफल, 50 मीटर रायफल प्रोन,

50 मीटर रायफल थ्री पोझिशन या प्रकारांमध्ये राज्य-राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकांची लयलूट केली.

2004 च्या साऊथ एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक, 2005 च्या एशियन एअर वेपन शूटिंग स्पर्धेत सुवर्ण व रौप्य,

2006 च्या एशियन गेम्समध्ये रौप्य, 2006 कॉमन वेल्थ स्पर्धेत 2 सुवर्णपदके,

2008 साऊथ एशियन गेम्समध्ये सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांची हॅट्ट्रिक,

2009 च्या दक्षिण आशियाई स्पर्धेत 2 सुवर्ण व 2 रौप्य अशी 4 पदके, 2009 वर्ल्डकप स्पर्धेत कांस्य पदकाचा वेध घेतला.

2010 च्या कॉमनवेल्थ शूटिंग स्पर्धेत कांस्य व दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेत 2 रौप्य व एका कांस्य पदकाची कमाई केली.

2010 म्युनिच येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 50 मीटर प्रोन स्पर्धेत जागतिक विक्रमाशी बरोबरी करत सुवर्णपदक पटकाविले.

2016 मध्ये ग्रँड प्रीक्समध्ये रौप्य तर 2018 च्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले.

याचवर्षी ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या कॉमन वेल्थ स्पर्धेत नव्या विक्रमासह सुवर्ण आणि रौप्य पदकांची कमाई केली.

2004 ते 2018 या कालावधीत 50 सुवर्ण, 28 रौप्य व 10 कांस्य पदकांची लयलूट करत तेजस्विनीने टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.

तिच्या कारकिर्दीबद्दल केंद्र शासनाना अर्जुन पुरस्कार, राज्य शासनाचा शिव छत्रपती पुरस्कार आणि इतर विविध पुरस्कारांनी तिला गौरविण्यात आले आहे.

सध्या तेजस्विनी सावंत महाराष्ट्र राज्य शासनाच्या क्रीडा विभागात विशेष अधिकारी म्हणून सक्रिय आहे.

Back to top button