SA Vs IND ODI : टीम इंडियाचा पुन्हा पराभव, मालिकाही गमावली - पुढारी

SA Vs IND ODI : टीम इंडियाचा पुन्हा पराभव, मालिकाही गमावली

पार्ल : पुढारी ऑनलाईन

पार्ल येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा सात गडी राखून पराभव केला. कसोटी मालिकेनंतर भारतीय संघाचा वनडे मालिकेतही पराभव झाला आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील विजयासह दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. शेवटचा वनडे सामना २३ जानेवारीला केपटाऊनमध्ये खेळवला जाईल.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ५० षटकांत ६ गडी गमावून २८७ धावा केल्या. भारताकडून कर्णधार केएल राहुलने ५५, ऋषभ पंतने ८५, शार्दुल ठाकूरने ४० धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ४८ षटकांत ३ गडी गमावून २८८ धावांचे लक्ष्य गाठत सामन्यास मालिका खिशात टाकली. मलानने ९१ आणि क्विंटन डीकॉकने ७८ धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का..

सलग दोन षटकांत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दोन विकेट गमावल्या. ३५व्या षटकात यनेमन मालन ९१ धावा काढून बाद झाला. यानंतर ३५.४ व्या षटकात युझवेंद्र चहलने टेंबा बावुमाला झेलबाद केले. त्याला ३६ चेंडूत ३५ धावा करता आल्या.

मलान ९१ धावांवर बाद..

३४.४ व्या षटकात मलान क्लीन बोल्ड झाला. त्याला बुमराहने माघारी धाडले. हा आफ्रिका संघाला दुसरा धक्का होता. जसप्रीत बुमराहने सामन्यातील पहिला बळी घेत टीम इंडियाच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. मालन ९१ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. याचबरोबर त्याची बावुमासोबतची महत्त्वपूर्ण भागीदारी संपुष्टात आली. दोघांमध्ये ८० धावांची भागिदारी झाली. यावेळी द. आफ्रिका संघाची धावसंख्या २ बाद २१२ होती.

मालन-बावुमा यांच्यात ५० धावांची भागीदारी

डी कॉकच्या विकेटनंतर भारतीय गोलंदाजांना विकेटसाठी झगडावे लागत आहे. २२ व्या षटकात डी कॉकची विकेट पडली. तेव्हापासून मालन आणि टेंबा बावुमा यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली आहे.

दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का

दक्षिण आफ्रिकेला १३२ धावांच्या एकूण धावसंख्येवर पहिला धक्का बसला. क्विंटन डी कॉक ६६ चेंडूत ७८ धावा काढून बाद झाला. त्याने सात चौकार आणि तीन षटकार मारले. शार्दुल ठाकूरने टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. शार्दुलचा चेंडू सरळ स्विंग होऊन डेकॉकच्या पायाला लागला. मैदानी पंच मारायस इरास्मस यांनी प्रथम डी कॉकला नाबाद दिले. यानंतर राहुलने डीआरएसचा वापर केला. चेंडू स्टंपच्या मध्यभागी आदळत असल्याचे रिप्लेमध्ये दिसून आले. यानंतर मैदानी पंचांनी निर्णय बदलला. मलाने अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याचे वनडे कारकिर्दीतील हे तिसरे अर्धशतक होते.

क्विंटन डीकॉकचे अर्धशतक

क्विंटन डीकॉकने वनडे कारकिर्दीतील २७ वे अर्धशतक झळकावले. दक्षिण आफ्रिकेने डी कॉकने आतापर्यंत सात वेळा भारताविरुद्ध फिफ्टी प्लस स्कोअर केले आहेत. यातील पाच वेळा फिफ्टी प्लसचे शतकात रूपांतर झाले आहे.

डेकॉकचे भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये ५०+ स्कोअर

१३५, १०६, १०१, १०३, १०९, ५३, ५०* (आज)

डीकॉकचा भुवनेश्वरकुमार हल्ला..

दक्षिण आफ्रिकेच्या डावातील दुसरे षटक भुवनेश्वर कुमारने टाकले. या षटकात डी कॉक आणि मलान यांनी मिळून १६ धावा कुटल्या. डी कॉकने या षटकात दोन चौकार आणि एक षटकार लगावला. दोन धावा अनुक्रमे एकेरी धावून आणि वाईडमधून मिळाल्या. दक्षिण आफ्रिकेने दोन षटकांनंतर एकही विकेट न गमावता २३ धावा केल्या.

भारताचे द. आफ्रिकेसमोर २८८ धावांचे लक्ष्य..

भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेसमोर २८८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पॉवरप्लेमध्ये चांगली सुरुवात केल्यानंतर भारताने दोन गडी लवकर गमावले. धवन २९ धावा करून तर विराट कोहली शुन्यावर बाद झाला. यानंतर कर्णधार केएल राहुलने ऋषभ पंतसह डाव सांभाळला आणि भारताची धावसंख्या १७९ नेली. यानंतर राहुल ५५ धावा करून बाद झाला. तर पंतही ८५ वर माघारी परतला. दोन विकेट्स झटपट गमावल्यानंतर भारताच्या मधल्या फळीने मागील सामन्याप्रमाणेच पुन्हा एकदा निराशा केली. श्रेयस अय्यर (११) आणि व्यंकटेश अय्यर (२४) काही खास प्रदर्शन करू शकले नाही. शेवटी अश्विन आणि शार्दुल ठाकूर यांनी चांगली भागीदारी करत भारताची धावसंख्या २८७ च्या पर्यंत नेली. अश्विन आणि शार्दुलने सातव्या विकेटसाठी ३८ चेंडूत ४८ धावांची भागीदारी केली. शार्दुल ठाकूरने नाबाद ४० धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून तबरेझ शम्सीने दोन बळी घेतले. सिसांडा मलागा, एडेन मार्कराम, केशव महाराज आणि अँडिले फेलुकवायो यांनी १-१ बळी घेतला.

टीम इंडियाने ६४ धावांवर दोन विकेट गमावले. त्यानंतर ऋषभ पंत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. पंतने मैदानात येताच आक्रमक पद्धतीने खेळ दाखवला. त्याने ४३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. ऋषभ मोठे फटके मारत होता आणि त्याची फलंदाजी पाहता तो आपले शतक पूर्ण करू शकेल असे वाटत होते. मात्र, असे होऊ शकले नाही आणि तबरेझ शम्सीच्या चेंडूवर ८५ धावांवर बाद झाला. त्याचे हे वनडेतील चौथे अर्धशतक आहे. त्याने केएल राहुल सोबत तिस-या विकेटसाठी ११५ धावांची भागिदारी केली.

Image

  • विराट कोहली 14व्यांदा वनडेत शून्यावर बाद झाला.
  • भारताच्या माजी कर्णधाराने गेल्या 17 डावांमध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये एकही शतक झळकावलेले नाही.
  • 2017 पासून क्रमवारीत अव्वल स्थानावर फलंदाजी करणारा विराट 17व्यांदा शून्यावर बाद झाला. हे आकडे तिन्ही फॉरमॅटसाठी आहेत.

Image

भारतीय संघ : के एल राहुल (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, ऋषभ पंत ((WK), श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, आर अश्विन, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल.

मालिकेतील आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी भारतीय फलंदाजांना या सामन्यात चांगली कामगिरी करावी लागणार आहे. या सामन्यात कर्णधार के. एल. राहुल याच्या नेतृत्वाचीदेखील पारख होईल. कर्णधार म्हणून पहिल्या सामन्यात राहुल अयशस्वी झाला होता. भारतीय फलंदाजांनी पहिल्या लढतीत निराशाजनक कामगिरी केली होती. त्यामुळे भारताला पराभव स्वीकारावा लागला होता.

Image

जेव्हा विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार होता तेव्हापासून मध्यक्रमाची कामगिरी चिंतेचा विषय होता. दुसर्‍या लढतीत भारताला विजय मिळवायचा झाल्यास मध्यक्रमाला चांगली कामगिरी केल्याशिवाय पर्याय नाही. श्रेयस अय्यरला शॉर्ट पिच गोलंदाजी विरुद्ध चांगला खेळ करावा लागेल. ऋषभ पंतकडूनदेखील संघाला मोठ्या अपेक्षा आहेत.

 

Back to top button