बॅडमिंटन स्पर्धा : नागपूरच्या मालविका बनसोडनं रचला इतिहास; सायना नेहवालला केलं पराभूत | पुढारी

बॅडमिंटन स्पर्धा : नागपूरच्या मालविका बनसोडनं रचला इतिहास; सायना नेहवालला केलं पराभूत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : दोनवेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू आणि एच. एस. प्रणॉय यांनी इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. तर, नागपूरची मालविका बनसोड हिच्याकडून सायना नेहवालला पराभवाचा सामना करावा लागला.

माजी चॅम्पियन आणि 2012 ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता सायनाला मालविका बनसोडने 21-17, 21-9 असे पराभूत केले. जागतिक क्रमवारीत 111 व्या स्थानी असलेल्या बनसोडला सायनाला पराभूत करण्यासाठी 34 मिनिटांचा कालावधी लागला.

बॅडमिंटन स्पर्धा  : ईरा शर्माचा सामना अष्मिता चालिहाशी होणार

त्यापूर्वी अव्वल मानांकित पी. व्ही. सिंधूने ईरा शर्माला 21-10, 21-10 असे पराभूत केले. आता तिचा सामना अष्मिता चालिहाशी होणार आहे. तिने याएले होयाऊला 21-17, 21-14 असे नमविले. बनसोडचा सामना भारताच्या आकर्षी कश्यपसोबत होईल. आकर्षीने केयुरा मोपाटिनला 21-10, 21-10 असे पराभूत केले. पुरुष एकेरीत प्रणॉयला ‘वॉकओव्हर’ मिळाला. कारण, मिथुन मंजुनाथला कोरोनाची लागण झाल्याने त्याने स्पर्धेतून माघार घेतली

. त्याचा सामना भारताच्या लक्ष्य सेनशी होईल. लक्ष्यने स्वीडनच्या फेलिक्स बुस्टेटला 21-12, 21-15 असे पराभूत केले. समीर वर्माचे अभियान दुसर्‍या फेरीतच संपुष्टात आले. स्नायूंच्या दुखापतीमुळे कॅनडाच्या ब्रेन यांग विरुद्धचा सामना त्याला मध्येच सोडावा लागला.

 

Back to top button