बुमराहचा धोकादायक इनस्विंग, शॉट न खेळताच फलंदाज क्लिनबोल्ड (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : केपटाऊन कसोटीच्या दुसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) पुन्हा एकदा आपले गोलंदाजी कौशल्य दाखवले. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होतो न होतोच त्याने पहिल्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर एडन मार्करामला अप्रतिम क्लिन बोल्ड केले. द. आफ्रिकेसाठी हा दुसरा धक्का होता.

जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) पुन्हा एकदा फलंदाजाला आपल्या घातक इन स्विंग चेंडूने चकित केले. वास्तविक, बुमराहचा इन स्विंग झालेला चेंडू एडेन मार्करामने न खेळता लिफ्ट केला अर्थात सोडून दिला. त्याला वाटले की चेंडू स्टंपवर न जाता विकेटाकीपरच्या हातात जाईल. पण त्याचा विचार त्याच्याच अंगलट आला. कारण बुमराहचा तो इन स्विंग झालेला चेंडू थेट ऑफ स्टंपवर आदळला आणि मार्कराम क्लिन बोल्ड झाला. बुमराहची ही दुसरी विकेट आहे.

काल (दि. ११) कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात बुमराहने (Jasprit Bumrah) यजमान संघाचा कर्णधार डीन एल्गरला त्याच्या धोकादायक इन स्विंग चेंडूवर स्लिपमध्ये झेल देण्यास भाग पाडले. स्लिपमध्ये पुजाराने कसही चूक न करता झेल पकडून भारताला पहिले यश मिळवून देण्यात बुमराह सोबत वाटा उचलला.

कसोटी सामन्याबद्दल बोलायचे झाले तर पहिल्या दिवशी भारताचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. द. आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांचा निभाव लागला नाही आणि संघ २२३ धावांत ऑलआऊट झाला. पण भारतासाठी जमेची बाजू म्हणजे, कोहलीची झुंझार अर्धशतकी खेळी. कोहलीने ७० धावांची शानदार खेळी साकारली. पण त्याला इतर फलंदाजांकडून चांगली साथ लाभली नाही. पुजाराने तेवढी ४३ धावा काढून कोहलीबरोबर ६५ धावांची भागिदारी केली आणि संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्याला चांगली सुरुवात करून मोठी खेळी खेळता आली नाही. तो यात उपयशी झाला. दक्षिण आफ्रिकेकडून रबाडाने ४ बळी घेतले. याशिवाय मार्को जेन्सनने तीन विकेट घेतल्या. दुआन ऑलिव्हियर, लुंगी एनगिडी आणि केशव महाराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

भारत आणि द. आफ्रिका यांनी १-१ कसोटी सामना जिंकला आहे. याचबरोबर मालिकेत बरोबरीत आहे. केपटाऊन कसोटी सामना जिंकणारा संघ मालिकाही जिंकेल. या मैदानावर भारताने आतापर्यंत एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. त्याऐवजी, त्याला ३ कसोटी सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले असून २ कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत.

Exit mobile version