SA vs IND : दुसऱ्या दिवस अखेर भारताच्या २ बाद ५७ धावा; ७० धावांची आघाडी

पुढारी ऑनलाईन डेस्क

दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा द. आफ्रिका विरुद्ध भारताने २ बाद ५७ बनवल्या होत्या. खेळपट्टीवर चेतेश्वर पुजारा ३१ चेंडूत ९ धावांवर तर कर्णधार विराट कोहली ३९ चेंडूत १४ धावांवर खेळत आहेत. संघाचे सलामीवीर लवकर माघारी परतल्यावर पुजारा आणि कोहली यांनी दिवसअखेर पुन्हा कोणतीही विकेट न गमावता ३३ धावांची भागिदारी केली. या भागीदारीच्या जोरावर भारताने खेळात ७० धावांची आघाडी मिळवली आहे.

के.एल. राहूल परतला तंबूत

अवघ्या सहाव्या षटकात भारताचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतले आहेत. मोर्को जेसनने सलामीवीर केएल राहूल याला माघारी पाठवले. राहूलने दुसऱ्या स्लीपमध्ये उभ्या असलेल्या मार्करमकडे झेल देऊन बाद झाला. त्याने २२ चेंडूत १० धावांची खेळी केली. भारताचे दोन्ही सलामीवीर माघारी परतल्याने संघ पुन्हा एकदा अडचणी सापडला आहे. अवघ्या २४ धावांवर २ फलंदाज गमावल्यामुळे संघाच्या खराब कामगिरीची मालिका दुसऱ्या डावात देखिल चालू असल्याचे बघायला मिळत आहेत. सध्या खेळपट्टीवर कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा खेळत आहेत. भारत दुसरा डाव : 28/2 (7).

भारताला बसला पहिला धक्का : मयांक अग्रवाल ७ धावांवर बाद

द. आफ्रिकेला २०९ धावात गुंडाळून नाममात्र १३ धावांची आघाडीघेत आपला दुसरा डाव सुरु करणाऱ्या भारताला पहिला धक्का बसला आहे. भारताचा सलामीवीर मयांक अग्रवाल अवघ्या ७ धावा करुन रबाडाची शिकार ठरला. मयांकने पहिल्या स्लीप मध्ये उभ्या असलेल्या कर्णधार डीन एल्गरकडे झेल देऊन बाद झाला. त्याने अवघ्या १५ चेंडूचा सामना करत एक चौकार लगावला.

या सामन्यात भारताचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह याने आफ्रिकेचे कंबरडे मोडले. त्याने आपल्या गोलंदाजीने आफ्रिकेच्या ५ फलंदाजांना माघारी धाडले. यामध्ये सलामीवीर जोडी कर्णधार डीन एल्गर (३), मार्करम (८) आणि डोके दुखी बनु पाहणार पीटरसन ( ७२), मार्को जेसन (७) तसेच लुंगी एन्गीडी यांचा समावेश आहे. यासोबत उमेश यादव आणि महोम्मद शामी यांनी प्रत्येकी २ तर शार्दुल ठाकूर याने १ बळी घेतला.

आफ्रिकेचा पहिला डाव २१० धावांवर संपुष्टात, भारताला १३ धावांची आघाडी

भारताला नाममात्र १३ धावांची आघाडी मिळाली आहे. पहिल्या डावात भारतीय खेळाडूंनी फारच सुमार दर्जाची कामगिरी केली. फक्त कर्णधार विराट कोहली आणि पुजारा वगळता कोणालाही धावा बनवता आल्या नाही. या खेळी भारताने द.आफ्रिकेसमोर २२३ धावांचे आव्हान दिले होते. पण भारतीय गोलंदाजांनी या धावसंख्येपर्यंत आफ्रिकेला पोहचू दिले नाही.

आता भारताला आपल्या दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या उभी करावी लागणार आहे. मागील सामन्यात आफ्रिकेने भारताच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत ऐतिहासिक विजय नोंदवला होता. आता भारताला पुन्हा तीच चूक करणे महागात पडू शकते. त्यामुळे भारताला यावेळी मोठ्या धाव संख्येचे आव्हान उभे करावे लागणार आहे. तेव्हा भारताचे आफ्रिकेतील ऐतिहासिक मालिका विजयाचे स्वप्न पूर्ण होईल.

दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २०९ धावांवर आटोपला. यामुळे भारताला नाममात्र १३ धावांची आघाडी मिळाली आहे. बुमराहने एन्गीडीला झेल बाद करत आफ्रिकेचा खेळ संपुष्टात आणला. लुंगी एन्गीडी ३ धावा करुन माघारी परतला तर ऑलिव्हर हा १० धावा करुन नाबाद राहिला.

आफ्रिकेला बसला नववा धक्का

लॉर्ड शार्दुल ठाकूर पुन्हा एकदा भारतीय संघासाठी धावून आला आहे. चालू सामन्यात सर्वात जास्त भारतीय खेळाडुंना बाद करणाऱ्या कगिसो रबाडाला शार्दुल ठाकूर याने रबाडाला बुमराह करवी झेल बाद केले. मोठा फटका मारण्याच्या नादात रबाडाने लॉग ऑफला झेल देऊन बाद झाला. रबाडाने १५ धावांची खेळी केली. आता आफ्रिका भारताने दिलेल्या आव्हानापेक्षा फक्त १५ धावांनी पिछाडीवर आहे.

पीटरसन बाद

चहापानाची विश्रांती संपल्यानंतर पुन्हा खेळ सुरु झाल्यावर बुमराहने भारताला त्रास ठरु पहात असलेल्या पीटरसनला स्लीप करवी झेल द्यायला भाग पाडले. स्लीपमध्ये पुजाराने पीटरसनाचा झेल पकडला. पीरसनने आफ्रिकेकडून खेळपट्टीवर बराच काळ तग धरुन ७२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. यासाठी त्याने १६६ चेंडूंचा सामना केला. आपल्या खेळीत त्याने ९ चौकार देखिल ठोकले

चहापानाची विश्रांती

कमी धावसंख्येचे आव्हान उभे करुन सुद्धा भारतीय संघाने सामन्यात पुनरागमनाची संधी निर्माण केली. भारतीय संघाच्या २२३ धावांचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या ७ फलंदाज बाद करण्यात टिम इंडियाला यश आले आहे. चहापाण्याची विश्रांती साठी सध्या खेळ थांबला असून आफ्रिकेने ७ बाद १७६ इतकी धावसंख्या उभी केली आहे. अद्याप ४७ धावांनी आफ्रिका पिछाडीवर आहे.

आफ्रिकेला बसला सातवा धक्का

चहापानासाठी खेळ थांबण्याच्या २ षटक आधी जसप्रीत बुमराह याने ६२ व्या षटकातील २ चेंडूवर मार्को जेसन याचा त्रिफळा उडविला. यावेळी द. आफ्रिकेची धावसंख्या १७६ वर ७ बाद अशी झाली.

शमीकडून द. आफ्रिकेला सहवा झटका

मोहम्मद शमीने ५५.४ व्या षटकात काइल व्हेरेनेची विकेट घेत यजमान संघाचे कंबरडे मोडले. तर विकेटकीपर ऋषभ पंतने व्हेरेनेचा (०) झेल पकडला. शमीने चौथ्या स्टंपवर फुलर लेंथ चेंडू फेकला. खेळपट्टीवर पडल्यानंतर चेंडू सरळ रेषेत गेला. त्याचवेळी फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न करताना चेंडू बॅटला स्पर्श करून विकेटकीपर ऋषभ पंतच्या हातात गेला. हा यजमान संघाला सहावा झटका होता.

शमीकडून द. आफ्रिकेला पाचवा झटका

मोहम्मद शमीने ५५.२ व्या षटकात टेंबा बावुमाची विकेट घेतली. बावुमाने ५२ चेंडूत २६ धावा केल्या. शमीने पाचव्या स्टंपवर चेंडू टाकला. खेळपट्टीवर चेंडू पडताच आऊट स्विंग झाला. त्यावेळी बचावात्मक फटका खेळण्यासाठी बावुमा मागे गेला आणि बॅटची कडा घेवून चेंडू दूस-या स्लिपमध्ये कोहलीच्या हाती गेला. कोहलीचा हा कसोटी क्रिकेटमधील १०० वा झेल ठरला.

कीगन पिटरसनचे अर्धशतक…

४०.१ व्या षटकात केगन पिटरसनने बुमराहने फेकलेला चेंडू बॅक्वर्ड स्क्वेअर लेगला फटकावून दोन धावा काढल्या. याच बरोबर त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याचे हे दुसरे अर्धशतक आहे. यापूर्वी जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पीटरसनने कसोटी करिअरमधील पहिले अर्धशतक झळकावले. ६२ धावांवर त्यांची खेळी संपुष्टार आली.

ड्युसेन बाद, द. आफ्रिकेला चौथा झटका

लंच ब्रेकनंतर पिटरसन आणि ड्युसेन यांची जोडी फोडण्यात भारताला यश आले. उमेश यादवने ३९.२ व्या षटकात द. आफ्रिकेला चौथा धक्का देत ड्युसेनला माघारी धाडले. स्लिपमध्ये कोहलीने त्याचा झेल पकडला. ड्युसेनने ५४ चेंडूत २१ धावा केल्या. त्याने पिटरसनच्या सोबतीने ६७ धावांची भागिदारी केली.

ड्युसेन आणि पिटरसनची अर्धशतकी भागिदारी…

व्हॅन डर ड्युसेन आणि केगन पिटरसन यांनी द. आफ्रिकेचा डाव सावरला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ८० चेंडूत ५० धावांची भागिदारी केली. तर दोघांनी आपल्या संघाची धावसंख्या लंचब्रेकपूर्वी ३५ षटकांत ३ बाद १०० पर्यंत पोहचवली. ही भागीदारी धोकादायक वाटत असून भारताला या दोन्ही फलंदाजांना लंचब्रेकनंतर बाद करावे लागेल.

आफ्रिकेची तिसरी विकेट पडली

उमेश यादवने दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का दिला. त्याने नाईट वॉचमन केशव महाराज याचा त्रिफळला उडवला. महाराजाने ४५ चेंडूत ४ चौकारांच्या जोरावर २५ धावा केल्या. खेळपट्टीवर पडल्यानंतर उमेशचा चेंडू इन स्विंग झाला. महाराजने हा चेंडू डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला. पण बॅट आणि पॅडमध्ये मोठे अंतर होते आणि येथूनच चेंडू सटकून मधल्या यष्टीच्या मध्यभागी आदळला.

राहुलने कीगन पीटरसनचा झेल सोडला…

आफ्रिकेचा फलंदाज कीगन पीटरसनला चार धावांच्या जोरावर जीवदान मिळाले. शमीचा चेंडू पीटरसनच्या बॅटच्या बाहेरील कडा घेऊन तिसऱ्या स्लिपकडे गेला. लोकेश राहुलने झेपावून झेल पकडण्याचा प्रयत्न केला पण चेंडू हातात बसला नाही. सध्या भारतीय गोलंदाज चांगली गोलंदाजी करत आहेत आणि त्यांनी दोन्ही फलंदाजांवर दडपण ठेवण्यात यशस्वी झाले आहेत.

आफ्रिकेची दुसरी विकेट…

जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेला आजच्या दिवसाच्या सुरुवातीलाच आणखी एक धक्का दिला. त्याने मार्करामला आठ धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. खेळपट्टीवर पडल्यानंतर बुमराहचा चेंडू इन स्विंग झाला आणि मार्करामने चेंडू सोडला. हा चेंडू विकेटकीपरच्या हातात जाईल असा त्याचा अंदाज होता. पण चेंडू ऑफ स्टंपवर आदळला. बुमराहने भारताला चांगली सुरुवात करून दिली. आफ्रिकेचे दोन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले असून आता भारताला आफ्रिकेला लवकरच गुंडाळायला आवडेल.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस आहे (south africa vs india 3rd test day 2nd). सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजांवर सगळ्या आशा टिकून आहेत. आज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बुमराह, शमी, उमेश आणि अश्विन यांच्याकडून खूप आशा आहेत. यजमान द. आफ्रिकेच्या विकेट्स लवकरात-लवकर घेणे हेच आता गोलंदाजांचे लक्ष्य असेल.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटीत हवामान स्वच्छ असेल. विशेषत: या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पावसाची शक्यता नाही. अशा स्थितीत भारतीय वेगवान गोलंदाजांना कठोर परिश्रम करून विकेट्स काढाव्या लागणार आहेत, अशी तज्ज्ञांनी शक्यता वर्तवली आहे. याचा अर्थ भारतीय वेगवान गोलंदाजांना हवामानाकडून कोणतीही मदत मिळणार नाही. त्यांना प्राप्त परिस्थितीत स्वतःहून चांगली गोलंदाजी करून विकेट्स घ्याव्या लागतील. तथापि, केपटाऊनची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना पोषक आहे आणि ते सामन्याच्या पहिल्या डावातही दिसून आले. आता भारतीय गोलंदाजांना याचा फायदा कितपत उठवता येतो हे याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

भारताचा पहिला डाव….

तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांच्या वेगवान आक्रमणापुढे भारतीय आघाडीची फळी कोसळली. कर्णधार विराट कोहली मात्र एखाद्या झुंजार योद्ध्यासारखा लढला. त्याने केलेल्या ७९ धावांमुळे भारताने पहिल्या डावात २२३ धावांपर्यंत मजल मारली. दक्षिण आफ्रिकेच्या रबाडाने ४ तर जेन्सेनने ३ विकेटस् घेतल्या. दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचीही एक विकेट पडली असून, त्यांनी १ बाद १७ धावा केल्या आहेत. जसप्रीत बुमराने भारताला पहिले यश मिळवून दिले. त्याने डीन एल्गरला (३) तंबूत धाडले.

दरम्यान, केपटाऊनमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसर्‍या आणि निर्णायक कसोटी सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. ३३ धावांवर दोन्ही सलामीवीर पॅव्हेलियनमध्ये परतले. राहुल १२ धावांवर बाद झाला. डुआन ऑलिव्हियरने यष्टिरक्षक वेर्नेनकरवी त्याला झेलबाद केले. तर, मयंकला ३५ चेंडूंत १५ धावांच करता आल्या. त्याला कॅगिसो रबाडाने एडन मार्करामकरवी झेलबाद केले.

उपहारापर्यंत भारताने दोन गडी गमावून ७५ धावा केल्या. त्यानंतर पुन्हा खेळ सुरू झाला पण भारताला धक्का बसला. ९५ धावांच्या एकूण धावसंख्येवर भारताला तिसरा धक्‍का बसला. संयमी फलंदाजी करणार्‍या चेतेश्‍वर पुजाराला वेगवान गोलंदाज मार्को जेन्सेनच्या चेंडूवर यष्टिरक्षक वेर्नेनने झेलबाद केले. पुजाराचे अर्धशतक हुकले आणि तो ४३ धावांवर बाद झाला. त्याने आणि विराट कोहलीने तिसर्‍या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केली. पुजारा बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे मैदानात उतरला; पण या कसोटीतही अपयशाने त्याची पाठ सोडली नाही. रहाणे अवघ्या ९ धावांवर तंबूत परतला. यावेळी टीम इंडियाची धावसंख्या ११६ होती. त्याला ४२.१ व्या षटकात कॅगिसो रबाडाने यष्टिरक्षक वर्नेननच्या हाती झेलबाद केले.

रहाणे नंतर यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने कोहलीला बर्‍यापैकी साथ दिली. दरम्यान, विराट कोहलीने ऑलिव्हरला चौकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले. यासाठी त्याने १५८ चेंडू खेळले. त्याचे कारकिर्दीतील हे दुसर्‍या क्रमांकाचे संथ अर्धशतक ठरले. यापूर्वी त्याने २०१२ मध्ये नागपुरात इंग्लंडविरुद्ध अर्धशतकासाठी १७१ चेंडू खेळले होते. कोहली, पंत या दोघांची फुलत चाललेली भागीदारी शेवटी जेन्सेनने फोडली. पंत २७ धावांवर बाद झाला. यानंतर पुन्हा गळती लागली आणि अश्‍विन (२), शार्दुल ठाकूर (१२), बुमराह (०) हे पाठोपाठ बाद झाले. विराट कोहली नवव्या गड्याच्या रुपाने बाद झाला. ७७.३ व्या षटकात लुंगी एन्गिडी शमीला (७) बाद करून भारताचा ऑलआऊट केला. यावबरोबर केपटाऊन कसोटीत भारताचा पहिला डाव २२३ धावांत संपुष्टात आला.

Exit mobile version