राहुल द्रविड कोच असता तर करण जोहरची 'ती' हिम्मत झाली नसती

मुंबई; पुढारी ऑनलाईन: श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाचे विजयी सलामी दिली. संघाचे मुख्य प्रशिक्षकपद माजी भारतीय कर्णधार राहुल द्रविड याच्याकडे दिले आहे. संघाचा विजय पाहता कोच रवी शास्त्री सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागले. तर राहुल द्रविडचे काैतुक हाेत आहे.

दरम्यान, विनोदी कलाकार रेहमान खान याने ट्विट करत रवी शास्त्रींची संघावरील पकड किती ढिली आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर राहुल द्रविडचे कौतुक केले आहे.

अधिक वाचा

ऑलिम्पिक बेड अँटी सेक्स, अमेरिकन धावपटूची टीका

टोकियो ऑलिम्पिक : भारताला सुवर्ण संधी

काय म्हटले आहे रेहमान खानने ट्विटमध्ये?

”राहुल द्रविड हा श्रीलंका दौर्‍यासाठी प्रशिक्षक आहे. हार्दिक पंड्यासाठी रवी शास्त्री ते राहुल द्रविड असे संक्रमण कठीण आहे. राहुल द्रविड हा भारताचा प्रशिक्षक असता, तर करण जोहरने पंड्याला कॉफी विथ करण शोमध्ये आमंत्रित करण्याची हिंमत केली नसती.”
अशा आशयचे ट्विट रेहमानने केले आहे.

पांड्या आणि कॉफी विथ करण शो काय आहे प्रकरण?

हार्दिक पंड्या केएल राहुलसह चित्रपट निर्माता करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये गेला होता. या शोमध्ये त्याने अनेक वादग्रस्त टिप्पणी केल्या होत्या.

“एकच मेसेज अनेक मुलींना पाठवण्यात मला काहीच अडचण नाही आणि मी त्यांच्याशी त्यांच्या ‘उपलब्ध’ असण्याबाबत खुलेआम चर्चा करतो,” असं हार्दिकने शोमध्ये सांगितले होते.

अधिक वाचा

शिखर धवन : टीम इंडियाचा सर्वात वयस्कर कर्णधार!

फिफा विश्वचषक स्पर्धेची रंगीत तालीमच

आपण अनेक महिलांसोबत रिलेशनशिप होतो आणि ही बाब पालकांनाही माहित असल्याची कबुली हार्दिक पंड्याने शोमध्ये दिली.
तो म्हणाला की, “जेव्हा मी कौमार्य गमावलं, त्यावेळी आई-वडिलांना ‘आज मी करुन आलोय’ असं सांगितलं होतं.

यानंतर सोशल मीडियावर हार्दिक पंड्याविरोधात संतापाची लाट पसरली होती. हे प्रकरण जसजसे वाढत गेले तसतसे बीसीसीआयने राहुल आणि पंड्यावर काही काळ बंदी घातली होती.

मागितली होती माफी

आपली चूक लक्षात आल्यानंतर पांड्याने खेद व्यक्त केली होती. “कॉफी विद करणध्ये माझ्या टिप्पणीमुळे जे दुखावले किंवा ज्यांना अपमान झाल्याचं वाटलं त्या सगळ्यांची माफी मागतो.

मी जरा जास्तच बोललो. मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. सन्मान” असे ट्विट करत पांड्याने माफी मागीतली होती.

हे वाचलंत का?

नेहा धुपिया दुसऱ्यांदा आई होणार, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज!

‘उम्र तेरा इंतज़ार कर लेंगे’ म्हणत शेवंता फेम अपूर्वा नेमळेकरचा नथीचा नखरा

साउथ सुपरस्टार सिद्धार्थ युट्यूबवर मृत घोषीत अन्…

Back to top button