पेट्रोल-डिझेलचे दर कोण ठरवते? | पुढारी | पुढारी

पेट्रोल-डिझेलचे दर कोण ठरवते? | पुढारी

पुढारी ऑनलाईन डेस्क :  देशात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. पेट्रोलने शंभरी पार केली आहे. यावरुन सोशल मीडियावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहे. सोशल मीडियावरुन चांगलाच वादंग सुरु आहे. पेट्रोल, डिझेलचे दर नेमक ठरवत तरी कोण यावरुन चर्चा सुरु आहेत. 

सत्तेतील पक्षाचे कार्यकर्ते दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ठरवते अशी बाजू घेत आहेत. तर विरोधी पक्षातील कार्यकर्ते तुमच्याच पक्षाने दर वाढवल्याचे बोलत आहेत. या सोशल मीडियावरील भांडणाने सर्वसामान्य जनतेचा मात्र गोंधळ निर्माण झालाय. आता पाहुया नेमका हा दर ठरवत तरी कोण? 

पेट्रोल, डिझेलचे आजचे दर 

आज कोल्हापुरात पेट्रोलचे दर एक लीटरसाठी १०० रुपये ३२ पैसे एवढा आहे. तर डिझेल ९० रुपये ६५ पैसे आहे. 

इंधनाचे दर कसे ठरतात?

देशात २०१४ मध्ये केंद्र सरकारने एलपीजी आणि केरोसीन वगळून पेट्रोल-डिझेलला खुल्या बाजारपेठेत आणले. पेट्रोल-डिझेलचे दर सरकार न ठरवता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ठरवणार याला डायनामिक प्रोसेस म्हणतात. आपल्या देशात पेट्रोल-डिझेलचे दर हे रोज सकाळी ६ वाजता बदलतात. देशात ८० टक्के इंधन हे आयात होते. याचे दर डॉलरमध्ये असतात. 

देशात महत्वाच्या तीन सरकारी ऑईन कंपन्या आहेत. याच कंपन्यांच्या माध्यमातून देशात ९० टक्के तेल बाजारात येते. याच कंपन्यां पेट्रोल-डिझेलचे दर ठरवतात. आता या कंपन्यामध्ये संचालकांची नेमणूक सरकारने केलेली असते. 

राज्य सरकारचा पेट्रोलवरील कर किती? 

पेट्रोल वर राज्य सरकारचाही वेगळा कर असतो. तो कर आता २६.६४ रुपये एवढा आहे. लीटर मागे राज्य सरकार एवढा कर वसूल करत असते.  

राज्य सरकारचा डिझेल करवरील किती?

डिझेलवरही राज्य सरकार कर आकारत असते. तो कर सध्या १९.२६ रुपये एवढा आहे. प्रति लीटर आकारला जातो.   

केंद्र सरकारचा पेट्रोलवरील कर किती?   

पेट्रोल वर केंद्र सरकारचाही वेगळा कर आहे. केंद्र सरकार लीटरमागे ३२.९८ रुपये एवढा कर वसूल करत असते. यात पुढे पेट्रोल वरील वाहतूक खर्च हा लीटर पाठिमागे ३२ पैसे एवढी आहे. तर डिलर्स यांचे कमिशनही असते ते ३.५६ पैसे एवढी आहे. हे सर्व  एक.ित्रत करुन  एका लीटरमागे पेट्रोलचे दर ठरवले जातात. 

केंद्र सरकारचा डिझेल वरील कर किती?

डिझेल वरही केंद्र सरकार कर आकारत असते. तो कर सध्या ३१.८३ रुपये  एवढा आहे. हा एक लीटर पाठिमागे आकारला जातो. यात वाहतुक खर्च २९ पैसे असतो. तर डिलरचे डिझेल वरील लीटर पाठिमागे कमिशन २ रुपये ५२ पैसे एवढे असते. 

सध्या सोशल मीडियावर पेट्रोल-डिझेलच्या दरावरुन सत्तेतील पक्षाचे कार्यकर्ते व विरोधी पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात भिडत आहेत. राज्य सरकारने पेट्रोल-डिझेल वरील कर कमी केला पाहिजे, अशी मागणी राज्‍यातील विरोधी पक्ष करीत आहे. तर काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणत आहेत केंद्राने कर कमी करुन पेट्रोल, डिझेल चे दर कमी केले पाहिजेत. या दोन्ही बाजुच्या गोंधळात सर्व सर्वसामान्य जनतेच बजेट मात्र ढासळले आहे. 

वाचा : मराठा समाजाला ‘EWS’ प्रवर्गातून १० टक्‍के आरक्षण!

Back to top button