नागपूर : म्युकरमायकोसिस टास्क फोर्सचे कामकाज सुरू | पुढारी

नागपूर : म्युकरमायकोसिस टास्क फोर्सचे कामकाज सुरू

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांच्या सूचनेनुसार म्युकरमायकोसिसच्या विस्तारित टास्क फोर्सची कामकाजाला नागपूरात सुरूवात झाली आहे. शहरातील रुग्णांची संख्या, उपचाराची पद्धत, जनजागृती आणि आजारावर नियंत्रण आणण्याबाबत या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत विचारविनिमय झाले. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर या पूर्वीच्या तेरा सदस्यीय समितीला बावीस सदस्यीय समिती असे विस्तारित स्वरूप देण्यात आले.

वाचा : जळगाव जिल्ह्यातील ५१ गुन्हेगार हद्दपार; पोलिस अधिक्षकांचा दणका 

या बैठकीमध्ये म्युकरमायकोसिस व अन्य बुरशीजन्य आजाराबद्दल तज्ज्ञांची चर्चा झाली.  या संदर्भात उपचाराची प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्यासाठी एक उपसमिती, तर शहरातील उपचार करणाऱ्या हॉस्पिटलचे सर्वेक्षण करण्यासाठी एक समिती तयार करण्यात आली. सर्व हॉस्पिटलकडून सध्या माहिती गोळा करण्यात येणार आहे. सोबतच आजाराच्या जनजागृतीसाठी मोहिम आखण्याचे सुद्धा निर्देशित करण्यात आले. 

वाचा : पुन्हा कोरोनाचा नवा व्हेरियंट; 7 दिवसांत रुग्णाचं वजन करतो कमी

या वेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. प्रशांत निखाडे, डॉ. मिलिंद भ्रुशंडी, डॉ. आशिष थुल, डॉ. गिरीश भुतडा, डॉ. रामक्रिष्णा शिनॉय, डॉ. अरविंद सरनाईक डॉ. बिपिन देहाने, डॉ. मिलिंद चांगोले, डॉ. श्याम बाभुळकर,डॉ. दिनेश अग्रवाल, डॉ. उदय नारलावार, डॉ. रवींद्र खडसे, डॉ. मीना मिश्रा, डॉ. नितीन शिंदे, डॉ. अश्विनी तायडे, डॉ. कमल भुतडा, डॉ. संजय चिलकर, डॉ. वर्षा देवस्थळे, रिता जॉन, डॉ. हर्षा मेश्राम, डॉ. नितीन गुल्हाने, डॉ. दिनेश अग्रवाल, डॉ. तेजस्विनी गेडाम, डॉ. विनोद पाखधूने, डॉ. पुरवली काटकर, डॉ. दीपिका साखरे, सोनल रोडे आदी उपस्थित होते.

Back to top button