नाशिक : कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसनंतर अंगाला चिकटू लागल्‍या स्‍टीलच्या वस्‍तू! | पुढारी

नाशिक : कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसनंतर अंगाला चिकटू लागल्‍या स्‍टीलच्या वस्‍तू!

सिडको; पुढारी वृत्तसेवा : कोरोना संसर्ग नियंत्रणीत आणण्यासाठी शासनाकडून लसीकरण मोहीम सुरू आहे. सिडकोतील एका ज्येष्ठ नागरिकाने कोरोनाची दुसरी लस घेतल्यानंतर त्यांच्या हाताला लोखंडी व स्टीलच्या वस्तू चिटकत असल्याचा आगळा वेगळा प्रकार समोर आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. हा प्रकार पाहण्यासाठी नागरिकांनी त्यांच्या घरी गर्दी केली आहे.दरम्‍यान महाराष्‍ट्र टास्‍क फोर्सचे डॉ तात्‍याराव लहाणे यांनी हा प्रकार पूर्णपणे फेटाळून लावला आहे. स्‍टील चिकटणे आणि कोरोना लसीचा काहीही संबंध नसल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले आहे. तसेच अरविंद सोनार यांनी पुन्हा वैद्यकीय तपासणी करून घ्‍यावी अशी विनंती केली आहे. 

जुने सिडकोतील शिवाजी चौक येथे राहणारे अरविंद जगन्नाथ सोनार (वय 71) यांनी कोरोनाच्या कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस पत्नी मंगला समवेत खाजगी रुग्णालयात दि. २ जून रोजी घेतला. त्यांचा मुलगा जयंत हा बातम्या बघत असताना दिल्ली भागात लस घेतलेल्‍या एका व्यक्‍तीला लोखंडाच्या वस्तू चिटकत असल्याचे त्याला समजले. या नंतर जयंतने वडिलांना तुम्‍हीही लस घेतली आहे. तुमच्या हाताला वस्तू चिटकतात का? म्हणून विचारणा केली. त्या नंतर जयंत याने वडिलांच्या अंगावर स्‍टिलचे चमचे, स्‍टिलची भातवडी, पळी आणि नाणी लावून पाहिली. तेव्हा त्‍यांना आश्चर्याचा धक्‍का बसला. 

अधिक वाचा : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनात शरद पवारांकडून शिवसेनेचं कौतुक! (video)

कारण अरविंद सोनार यांच्या हाताला लोखंडाच्या व स्टीलच्या वस्तू पैसे, चमचे चिटकत असल्याचे निदर्शनास आले. हाताला घाम आला असेल म्हणून त्यांनी हात धुतला, या नंतर त्यांनी आंघोळ केली व पून्हा लोखंडी व स्टीलच्या वस्तू अंगावर चिटकविल्या, तर मात्र पुन्हा हाच प्रकार घडला. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही अशा वस्तू चिटकत असल्याचे समोर आले. अरविंद सोनार यांच्या म्हणण्यानुसार लस घेतल्यानंतर हा प्रकार घडला आहे. त्यामुळे यापुढे हा प्रकार संशोधनाचा विषय ठरणार आहे. याबाबत प्रशासनापुढे नवीन आव्हान उभे राहिले असून, हा संशोधनाचा विषय समोर येत आहे.

अधिक वाचा : पावसाळ्यात मुंबईची ‘तुंबई’ का होते?

लोखंडी व स्टीलच्या वस्तू हाताला चिटकतात- मी लस घेतल्यानंतर हा प्रकार घडतो आहे. यापूर्वी माझ्या आयुष्यात अशा कोणत्याही वस्तू माझ्या अंगाला चिटकत नव्हत्या. लस घेतल्या नंतर मला कोणताही त्रास झाला नाही, शरिरात कोणताही बदल झालेला नाही, उलट शरिराला टॉनिक मिळाल्‍या सारखे वाटते. याबद्दल मी डॉक्टरांचा सल्ला घेणार आहे. 


– अरविंद सोनार, ज्येष्ठ नागरिक, सिडको 


मी सुध्दा पती समवेत दुसरा कोव्हीशिल्डचा दुसरा डोस घेतला होता. परंतु माझ्या अंगाला लोखंडी व स्टील च्या वस्तू  चिटकत नाहीत.


– मंगला सोनार,

Back to top button