अंबड येथील 'मॅग्नॅटिक' बाप लेक जोडी; वडील कोविशिल्ड धारक तर..... | पुढारी

अंबड येथील 'मॅग्नॅटिक' बाप लेक जोडी; वडील कोविशिल्ड धारक तर.....


सिडको : पुढारी वृत्तसेव

कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर जुने सिडको येथील जेष्ठ नागरिक अरविंद सोनार ( ७२ )यांच्या शरीरावर स्टीलच्या, लोखंडी वस्तू चिटकत असल्याचा प्रकार नुकताच घडला होता. असाच प्रकार अंबड येथील महालक्ष्मी नगर भागात राहणाऱ्या नानासाहेब देवरे ( वय ६१ )  आणि त्यांचा मुलगा हिनेश ( ११ ) देवरे यांच्या देखील शरीरावर लोखंडी वस्तू चिटकत असल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे सिडको व अंबड भागात अंगावर वस्तू चिटकवण्याचे ( चिकटण्याचे ) सत्रच सुरु  झाले आहे.

नानासाहेब देवरे यांनी गेल्या दोन महिन्यापूर्वी कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस घेतला होता. तर त्यांचा मुलगा दिनेश ( वय ११ ) याने मात्र कुठल्याही लसीचा डोस घेतालेला नाही. तरीही त्याच्या अंगावर देखील स्टीलचे चमचे, कॉइन तसेच लोखंडी वस्तू चिटकत असल्याचे आढळून आले. यामुळे ज्या व्यक्तींनी लस घेतलेली नाही अशा व्यक्तींच्या शरीरावरही स्टीलचे चमचे, कॉइन तसेच लोखंडी वस्तू चिटकत असल्याने लस घेतल्यामुळे  हा प्रकार होत असल्याचा दावा फोल ठरला आहे. 

गेल्या दोन दिवसापूर्वी जुने सिडको येथील रहिवासी अरविंद सोनार (७२) यांनी कोविशिल्ड या लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर दोन-तीन दिवसांनी यांचा मुलगा जयंत यांनी मोबाईलवर लस घेतल्यानंतर शरीरावर स्टीलचे चमचे व लोखंडी वस्तू चिटकत असल्याचा व्हिडिओ बघितला होता. त्यावरून जयंत आणि त्यांचे वडील अरविंद यांच्या देखील शरीरावर स्टीलचे  चमचे, कॉइन, लोखंडी वस्तू चिटकत असल्याचे निदर्शनात आल्याने सिडकोत हा चर्चेचा विषय ठरला. 

परंतु महापालिकेच्या वैद्यकीय पथकाने अरविंद सोनार यांची तपासणी केली असता लसीमुळे असा प्रकार होतो हे चुकीचे असल्याचे सांगितले. शुक्रवारी अंबड येथील महालक्ष्मी नगर भागातदेखील नानासाहेब देवरे( ६१) यांच्या घरी तपासणी करण्यासाठी गेलो असता बाळासाहेब देवरे यांच्याबरोबर त्यांचा मुलगा हीनेश याच्या शरीरावर देखील स्टीलचे  चमचे, कॉइन चिटकत असल्याचे दिसून आले.

Back to top button