एकनाथ शिंदे यांनी महाबळेश्वर येथे केली भात पेरणी | पुढारी

एकनाथ शिंदे यांनी महाबळेश्वर येथे केली भात पेरणी

बामणोली (सातारा); पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे अधूनमधून जसा वेळ मिळेल तसे वारंवार आपल्या जन्मगावी दरे तर्फ तांब (ता. महाबळेश्वर) या ठिकाणी येतात. गावी आल्यानंतर ते आपल्या शेतीकडे लक्ष केंद्रित करत असतात. 

वाचा : गायत्री कंपनीवर जप्तीची कारवाई शक्य

पावसाळा तोंडावर आलेल्या असताना सर्वत्र भात, नाचणी, वरी या पावसाळी पिकांच्या पेरण्या सुरु आहेत. याच दरम्यान एकनाथ शिंदे यांनी आपल्या गावातील शेतीकडे लक्ष दिले. एकनाथ शिंदे यांनी आपल्या शेतात ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरट केले आहे. तसेच पारंपरिक पद्धतीने तरव्याच्या ठिकाणी पेरणी करून कुदळ्याने संपूर्ण तरवा कुदळून भाताची पेरणी पूर्ण केली आहे. शिंदे हे पूर्वीपासून कायम गावी आल्यावर शेतीची कामे ही आवर्जून करत असतात. 

वाचा : राजगुरूनगर नगरपरिषदेच्या दारात टाकला कचरा!

उन्हाळ्यात त्यांनी स्ट्रॉबेरी लागवड केली होती. त्याला लागूनच शेततळे तयार करून त्यात मासे देखील सोडले होते. एकनाथ शिंदे यांना शेतीच्या निमित्ताने कायम गावाकडची ओढ आहे. 

Back to top button