मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्गात मुसळधार | पुढारी

मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्गात मुसळधार

मुंबई / पुणे; पुढारी वृत्तसेवा : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे रविवार ते मंगळवारपर्यंत म्हणजे 12 ते 15 जून दरम्यान मुंबईसह राज्यात अतिवृष्टीचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. हवामान खात्याने मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात ’रेड अलर्ट’, तर पुणे, सातारा, कोल्हापूर,  पालघर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोलीत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

अधिक वाचा : धोकादायक इमारत कोसळणे ही मानवनिर्मित आपत्ती : हायकोर्ट

आज (ता.१२) येत्या चार तासांमध्ये मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. 13 व 14 जून रोजी मुंबई शहर व उपनगरातील काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असून, महापालिकेच्या सर्व यंत्रणांना सज्जतेचे आदेश देण्यात आले आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक, भारतीय तटरक्षक दल, नौसेनाही आवश्यकतेनुसार तत्पर आहे. बेस्ट (वाहतूक व विद्युत) आणि अदानी एनर्जी यांना सर्व सबस्टेशन ‘हाय अलर्ट’ वर ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

अधिक वाचा : मोदी कॅबिनेटमध्ये होणार बदल? रात्री उशिरापर्यंत मंत्र्यांच्या कामगिरीवर ‘चर्चा पे चर्चा’!

मिठी नदीच्या पातळीत वाढ झाल्यास क्रांतीनगर व इतर परिसरातील नागरिकांच्या तात्पुरत्या स्थलांतराची व्यवस्था करण्याच्या सूचना एल विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना देण्यात आली असून त्वरित मदतीकरिता राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाची एक तुकडी तेथे तैनात करण्यात आली आहे.  महापालिकेच्या 24 विभागांमधील शाळा ’तात्पुरते निवारे’ म्हणून सुसज्ज आहेत,अशी माहिती पालिकेने दिली आहे.

अधिक वाचा : WhatsApp वरुन पैसे कसे पाठवायचे?

Back to top button