'हरवलेली माणसं'च्या विक्रीतून मदतकार्य | पुढारी

घनसावंगी (जालना) ; पुढारी वृत्तसेवा : ‘हरवलेली माणसं’ या पुस्तकाच्या विक्रीतून कोविड रुग्णांच्या मदत कार्यासोबतअंबड, घनसावंगी तालुक्यातील निराधार, अंध, अपंग, विधवा अशा २६ कुटूंबातील लोकांना प्रत्येकी दीड हजार रुपयांची रोख मदत पुस्तकाचे लेखक आणि समाजभानचे दादासाहेब थेटे यांनी प्रत्यक्ष कुटूंबाला भेट देऊन सुपूर्द केली.
‘हरवलेली माणसं’ या पुस्तकाच्या तीन आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. सामाजिक प्रश्नाच्या मांडणीबरोबर त्याची सोडवणूक करण्यासाठी एक माणूसही काय करू शकतो? याची जाणीव करून देणारे हे पुस्तक सामाजिक चळवळी उभ्या राहाव्यात म्हणूनच लिहले आहे. या पुस्तकातून आलेल्या पैशातून समाज उपयोगी कार्य घडून यावं ही माझी अपेक्षा होती. म्हणून या पैशातून आपण कोविड हेल्पलाईन आणि निराधार कुटूंबाना मदत करण्यासाठी ही रक्कम खर्च करत असल्याचे लेखक दादासाहेब थेटे यांनी सांगितले.
वाचा : संजिदाच्या हॉट फोटोंचं कलेक्शन, सेक्सी फोटो पाहून नेटकरी म्हणाले… (Photos)
निराधार कुटूंबातील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीदेखील समाजभान शैक्षणिक पालकत्व मोहिमेअंतर्गत घेण्यात आली. या मोहिमेसाठी समाजभानचे डॉ. गंगाधर धांडगे, अविनाश घोगरे, योगेश गायके, मोइंन शेख, डॉ. उमेश जाधव, डॉ. प्रदीप राजपूत, लहू धाईत, संदीप सातपुते आदींनी परिश्रम घेतले.
वाचा :माझ्या आईने ‘तिला’ दाजीसोबत रंगेहाथ पकडले होते! शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याचा सनसनाटी खुलासा