सोलापूर जिल्ह्यात 18 जणांचा कोरोनाने मृत्यू | पुढारी

सोलापूर जिल्ह्यात 18 जणांचा कोरोनाने मृत्यू

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा 

आज शहरासह ग्रामीण भागात कोरोना संक्रमितांची संख्या वाढली  आणि मृत्यूसंख्या घटली आहे. शनिवारी शहरात 1, तर ग्रामीण भागात 17 अशा 18 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नव्याने 500 रुग्णांची भर पडली आहे. 517 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. अद्याप 220 जणांचे अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत.

शनिवारी ग्रामीण भागातील 9 हजार 279 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 8 हजार 792 हजार अहवाल निगेटिव्ह, तर 487 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 493 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सोलापूर शहरातील 2 हजार 350 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यापैकी 2 हजार 337 जणांचे अहवाल निगेटिव्ह, तर 13 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोनामुक्त होऊन 24 जण घरी गेले.  

आजतागायत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 1 लाख 28 हजार 847  जण, तर शहरातील 28  हजार 410 जण असे एकूण 1 लाख 57 हजार 257 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यापैकी ग्रामीण भागातील 2 हजार 858, तर शहरातील 1 हजार 389 अशा 4 हजार 247 जणांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागातील 2 हजार 8270, तर शहरातील 198, अशा एकूण 3 हजार 25 जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील 1 लाख 23 हजार 162 आणि शहरातील 26 हजार 823 असे 1 लाख 49 हजार 985 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले 

आहेत. 

म्युकर मायकोसिसचा एकही रुग्ण, मृत्यू नाही

कोरोनापाठोपाठ म्युकर मायकोसिस या आजाराचेही रुग्ण आढळून येत होते. आतापर्यंत जिल्ह्यात 35 जणांचा मृत्यू झाला. एकूण 419 रुग्ण आढळून आले; पण सुदैवाने शनिवारी एकही नवीन रुग्ण आढळून आला नाही. एकाचाही मृत्यू झाला नाही. 

 

Back to top button