कोल्हापूर : वडिलांच्या उत्तरकार्याचा खर्च टाळून केली कोविड सेंटरला मदत! | पुढारी

कोल्हापूर : वडिलांच्या उत्तरकार्याचा खर्च टाळून केली कोविड सेंटरला मदत!

दानोळी; पुढारी वृत्तसेवा : येथील बोरचाटे कुटुंबीयांनी वडिलांच्या उत्तरकार्याचा खर्च लोकवर्गणीतून सुरु असलेल्या कोविड सेंटरला दिला. या उपक्रमाने बोरचाटे कुटुंबियांचे कौतुक होत आहे.

येथील सदाशिव परसु बोरचाटे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेले लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्स यांचा विचार करून बोरचाटे यांचे चिरंजीव संदीप उर्फ बाळ बोरचाटे आणि तानाजी बोरचाटे यांनी आपल्या वाडीलच्या उत्तर कार्याच्या कार्यक्रमाला बगल देत गावातील लोक वर्गणीतून सुरु केलेल्या कोविड सेंटरला ५ हजार ५५५ रुपयांची मदत केली. 

यावेळी बोलताना संदीप उर्फ बाळ बोरचाटे म्हणाले वडिलांचे निधन झाले आणि आमचे छत्र हरपले. कोविड सेंटरमुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत. आमच्या निधीमुळे एखाद्याचा प्राण वाचला. तर एखादे कुटुंबाचे छत्र वाचेल. आणि तीच आमच्या वडिलांना खरी श्रद्धांजली असेल. म्हणून उत्तर कार्याच्या खर्चाला बगल देऊन हि मदत देत आहोत. 

या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. निधी कोविड सेंटरचे सुकुमार सकाप्पा, रामचंद्र शिंदे, बबलू दळवी, गणेश साळोखे यांच्याकडे सोपविण्यात आला.  यावेळी संदीप बोरचाटे, तानाजी बोरचाटे, शंकर बोरचाटे, बाबासो बोरचाटे, सचिन बोरचाटे आदी उपस्थित होते.

तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो! अजित पवारांनी सांगितला फॉर्म्युला

कोल्हापूर : दै. पुढारीच्या दिव्यांगांच्या लसीकरण मोहिमेचा अजित पवारांकडून विशेष उल्लेख!

कोल्हापुरातील निर्बंध अजिबात शिथिल करणार नाही : अजित पवार

अजित पवारांच्या भेटीनंतर शाहू छत्रपती महाराजांचं मोठं वक्तव्य, मराठा आरक्षणाबाबत म्हणाले…

Back to top button