शिवसेना भवनासमोर भाजप-सेना कार्यकर्त्यांचा राडा!  | पुढारी

शिवसेना भवनासमोर भाजप-सेना कार्यकर्त्यांचा राडा! 

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईतील तरुणांनी दादर येथे शिवसेनेच्या विरोधात बुधवारी फटकार मोर्चा काढण्यात आला. अयोध्येत शिवसेनेने राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादनाबाबत खोटे आणि बनावट आरोप केल्याबद्दल तरुणांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात होता. मोर्चावेळी आंदोलकांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रचंड घोषणाबाजी करत प्रचंड परिसर दूमदमन सोडला.

यावेळी दादर परिसरात असलेल्या शिवसेना भवनासमोर तुफानी राडा झाला. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते यावेळी आमनेसामने आले. यामुळे दादर परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. राडा झाल्यानंतर भाजप आमदार राम कदम यांनी हाणामारीचे समर्थन करत नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. 

दुसरीकडे शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेना भवनावर हल्ला करण्याचा डाव होता, असा गंभीर आरोप केला आहे. सेना भाजप युती होती हे भाजप विसरलं आहे असे त्यांनी म्हटले आहे. राडा झाला त्यावेळी महिला कार्यकर्त्या आघाडीवर असल्याचे दिसून आले. 

मोर्चाचे नेतृत्व भारतीय जनता युवा मोर्चाचे मुंबईचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांनी केले. यावेळी  तेजिंदरसिंग तिवाना म्हणाले , सत्तेत राहण्यासाठी आणि खुर्ची कायम ठेवण्यासाठी शिवसेना सोनिया सेना बनून काँग्रेसच्या ईशाऱ्यावर पूर्णपणे नाचत आहे. 

सत्तेच्या लोभाने शिवसेनेला अशा प्रकारे अंधत्व आले आहे की आता ते हिंदु धर्म, आस्था असलेल्या भगवान श्री राम मंदिरात हिंदुहृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीविरूद्ध राजकीय षड्यंत्र रचत आहेत. हिंदू व आमच्या श्रद्धेवर हा हल्ला आहे. हा मोर्चा आपल्या तरूणाईच्या बाजूने आहे. धर्मातून परके झालेली शिवसेनेला फटकार आहे, सावधान! आपल्या क्षुल्लक राजकारणासाठी आमच्या धर्मावर आणि आस्थेवरील आक्रमण थांबवा. टकार मोर्चामध्ये भायुमोर्चा मुंबईचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी होते. 

Back to top button