१६ खलाशांना सुखरुप बाहेर काढण्यात यश | पुढारी

१६ खलाशांना सुखरुप बाहेर काढण्यात यश

मुंबई पुढारी ऑनलाईन : आज (ता.१७) अलिबाग येथील रेवदंडा- साळाव समुद्रात जेएसडब्ल्यू या कंपनीच्या बार्जचा अपघात झाला. यात १६ खलाशांना वाचवण्यात यश आले आहे. रेस्क्यू ऑपरेशन पोलिस आणि तटरक्षक दलाने केले आहे. जेएसडब्ल्यू कंपनीची एमव्ही मंगलम बार्ज कच्चा माल घेऊन निघाली होती. अशी माहिती रायगड पोलिसांनी दिली आहे. 

या बार्जवर १६ खलाशी होते. हा बार्ज बुधवारी सायंकाळी कंपनीपासून थोड्याच अंतरावर गेल्यावर गाळात अडकून बसली. प्रयत्न करुनही त्यांना बार्ज यातून बाहेर काढण्यात यश येत नव्हते. पण आठ ते दहा तासात उलठून गेले होते. बार्ज खालून लिक झाल्याचे निदर्शनास आले.  

बार्जमध्ये हळूहळू पाणी शिरु लागल्याने नंतर सर्वांचीच तारांबळ उडाली. सकाळी याबाबत रायगड पोलिसांना माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दलाच्या मदतीने गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता बचावकार्य हाती घेण्यात आले. बुधवारी सायंकाळी साडेपाच ते गुरुवारी सकाळी साडे दहा असे तब्बल १७ तास खलाशी बार्जवरच अडकून पडले होते.

बचाव कार्यासाठी भारतीय तटरक्षक दलाचे दोन हेलीकॉप्टर, बोटी बचाव कार्यात पुढे होत्या. बार्जवरील १३ खलाशांना हेलीकॉप्टरच्या, तर तीन खलाशांना बोटीच्या सहायाने बाहेर काढण्यात यश आले आहे. 

वाचा : स्वरा भास्कर, ट्विटरविरोधात गुन्हा दाखल!

Back to top button